शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

साहित्यिकांना उद्योगनगरीची मोहिनी

By admin | Updated: January 20, 2016 00:54 IST

पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर असून, विविध अंगाने परिपूर्ण शहर आहे. वाहतुकीची कोंडी कोठेही झाल्याचे दिसून आले नाही.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर असून, विविध अंगाने परिपूर्ण शहर आहे. वाहतुकीची कोंडी कोठेही झाल्याचे दिसून आले नाही. या परिसरातील उद्याने सुस्थितीत असून पर्यावरण अतिशय सुंदर आहे. भव्य रस्ते व उड्डाणपूल शहरात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मोहित करणारे आहेत, अशा भावना राज्याच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या साहित्यिकांनी व्यक्त केल्या. दोनशे साहित्यिकांनी सहलीचा लाभ घेतला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने साहित्यिकांसाठी पिंपरी-चिंचवड शहर दर्शन आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी या भावना व्यक्त केल्या. पिंपरी-चिंचवड शहरदर्शन करण्यासाठी दोन सत्रांमध्ये आयोजन करण्यात आले होते. या वेळी सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, इचलकरंजी, मिरज, ठाणे, मुंबई इ. विविध भागांतून आलेल्या बहुसंख्य मान्यवरांनी या दर्शनसहलीचा लाभ घेतला. साहित्यरसिकांनी बीआरटीएस प्रकल्प, दुर्गादेवी टेकडी, भक्ती-शक्ती शिल्प, तसेच सायन्स पार्क इत्यादी ठिकाणे दाखविण्यात आली. या दर्शनसहलीमध्ये जवळजवळ २०० साहित्यिक मान्यवरांनी सहभाग घेतला. जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले व प्रवीण बागलाणे यांनी गाइड म्हणून साहित्यरसिकांना माहिती दिली. (प्रतिनिधी)