शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिकनगरीत ग्रंथालयांची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 04:42 IST

पिंपरी-चिंचवड : सांस्कृतिकनगरी झाली असली, तरी वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी प्रयत्नांचा अभाव

पिंपरी : पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीची वाटचाल सांस्कृतिकनगरीकडे सुरू आहे. मात्र, ३५ वर्षांच्या वाटचालीत वाचनसंस्कृती या शहरात रुजलेली नाही. शहरात ग्रंथालयांची वानवा आणि प्रकाशन संस्थांची कमतरता आहे. डिजिटल ग्रंथालये आणि फिरती वाचनालये सुरू करायला हवीत.गाव ते महानगर आणि महानगर ते स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. पायाभूत सुविधांच्या दृष्टीने शहर स्मार्ट झाले असले, तरी साहित्यिक, वैचारिक दृष्टीने ओळख निर्माण करण्याची गरज आहे. मैदाने, रस्ते, नाट्यगृहे वाढत असताना वाचनसंस्कृती वाढीस लागण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.शहराची लोकसंख्या २२ लाखांवर पोहोचली आहे. मात्र, वाचनालये आणि ग्रंथालयांची संख्या अत्यल्प आहे. शहरात महापालिकेची आणि खासगी अशी एकूण २४ वाचनालये, ग्रंथालये आहेत.खासगी ग्रंथालयांचीही संख्या कमी आहे. वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी महापालिका, तसेच विविध संस्थांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. पुण्याचे जुळे शहर म्हणून शहराची ओळख असल्याने अजूनही पुण्याएवढ्या प्रशस्त आणि अत्याधुनिक ग्रंथालयांचा अभाव आहे. तसेच पुस्तकनिर्मितीचे प्रमाणही कमी आहे. तसेच बहुतांश प्रकाशक हे पुस्तकनिर्मितीची कामे पुण्यातूनच करवून घेतात. शहरात पुस्तक निर्मितीच्या संस्था वाढायला हव्यात. डिजिटल ग्रंथालयांचीही वानवा शहरात आहे.

संशोधकांची गैरसोयपिंपरी-चिंचवड शहरात दीडशेहून अधिक महाविद्यालये आहेत. महाविद्यालयांमध्ये असणाऱ्या पुस्तकांचे प्रमाण हे अत्यल्प आणि अभ्यासक्रमाशी संबंधितच आहे. मराठी आणि साहित्य, विज्ञानविषयक, कलाविषयक संशोधन करणाºयांसाठी शहरात सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे पुण्यातील नामवंत ग्रंथालयांचा आधार संशोधकांना घ्यावा लागतो. या परिसरात मध्यवर्ती ग्रंथालय निर्माण करावे, अशी संशोधकांची मागणी आहे.महाराष्टÑ साहित्य परिषद, भोसरी शाखेचे अध्यक्ष मुरलीधर साठे म्हणाले, ‘‘जागतिक पुस्तक दिन आहे. त्यानिमित्ताने वाचन संस्कृती वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. डिजिटल ग्रंथालयेही निर्माण होणे गरजेचे आहे. शहरात फिरती वाचनालये सुरू करायला हवीत. शाळेत वाचनालय निर्माण करायला हवे. ग्रंथालयांची संख्या वाढवायला. मध्यवर्ती ग्रंथालयही शहरात असावे.’’वाचनसंस्कृती वाढविण्यासाठीमहापालिकेने शहरात मध्यवर्ती ग्रंथालयांची निर्मिती करावी.ग्रंथालये आणि वाचनालयांसाठी अनुदान योजना सुरू करायला हवी.शिक्षण मंडळातर्फे शाळांमध्येसाहित्यविषयक पुस्तकांचे ग्रंथालय अनिवार्य करावे.ा्रकाशन संस्थांची निर्मिती करायला हवी. पुस्तकनिर्मिती कारखान्यांसाठी धोरण हवे.मोबाईल, फिरती ग्रंथालये सुरू करायला हवीत. साहित्यविषयक संस्थांचा सहभाग वाढवायला हवा.

टॅग्स :world book dayजागतिक पुस्तक दिन