शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वेतनवाढ करार अखेर मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 06:10 IST

टाटा मोटर्स कंपनीतील कार विभागातील २२०० कामगारांना वेतनवाढ देण्यात आली. १७ हजार ३०० रुपयांची वेतनवाढ मिळाल्याने कामगारांमध्ये आनंदाचे

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : टाटा मोटर्स कंपनीतील कार विभागातील २२०० कामगारांना वेतनवाढ देण्यात आली. १७ हजार ३०० रुपयांची वेतनवाढ मिळाल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कामगार संघटनेतील आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या वादामुळे वेतनवाढीचा प्रश्न रखडला होता. ज्यांच्यात वाद आहेत असे पदाधिकारी बाजूला ठेवून अखेर गुरुवारी हा वेतनवाढ करार करण्यात आला. कार विभागातील कामगारांची रखडलेली वेतनवाढ मार्गी लागण्यासाठी हालचाली सुरू असल्याबाबतचे सर्वप्रथम वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. त्यानुसार गुरुवारी हा करार पार पडला. मार्च महिन्यात झालेल्या कराराने सीयूव्ही प्लँटमधील सुमारे साडे पाच हजार कामगारांना वेतनवाढीचा लाभ मिळाला. मात्र, कार प्लँटमधील उर्वरित २२०० कामगार या लाभाच्या प्रतीक्षेत होते. संघटनेच्या अध्यक्षपदावरून वाद असल्याने नेमका करार कोणाशी करायचा असा मुद्दा कंपनी व्यवस्थापनाने उपस्थित केला होता. कामगार संघटनेचे नेमके अध्यक्ष कोण यावरून त्यांच्यात दावे-प्रतिदावे सुरू होते. अखेर ज्यांचे वाद आहेत. ते पदाधिकारी बाजूला ठेवून तोडगा काढण्यात आला. त्यानुसार अन्य नऊ कामगार प्रतिनिधींनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. व्यवस्थापनाकडून कार्यकारी संचालक सतीश बोरवणकर या वेळी उपस्थित होते. या करारानुसार दोन हजार २०० कामगारांना १७ हजार ३०० रुपयांची वेतनवाढ देण्यात आली. करार झाल्यानंतर घोषणाबाजी करण्यात आली. रखडलेला करार मार्गी लागल्याने कामगारांनी आनंद व्यक्त केला. मानद अध्यक्षांच्या शिष्टाईने करार मार्गीटाटा मोटर्स कंपनीतील कामगार व व्यवस्थापनातील संघर्ष १९ महिने सुरू होता. टाटा उद्योग समुहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी शिष्टाई केल्याने मार्च महिन्यात मार्ग निघाला होता. त्यामुळे साडेपाच हजार कामगारांना १७ हजार ३०० रुपये वाढ मिळाली. या कारारानंतर आठवड्याभरात कार विभाग आणि टाटा आॅटोमेशन लिमिटेड विभागाचा वेतनवाढ करार करण्यात येतो. मात्र, या विभागांचा करार होत नव्हता.