शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

प्रचारासाठी नातीगोती झाली सक्रिय

By admin | Updated: February 15, 2017 02:04 IST

मावळ पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूकांचे बिगूल वाजले असून, प्रचाराला केवळ सहा दिवसांचा अवधी राहिला असल्याने

लोणावळा : मावळ पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूकांचे बिगूल वाजले असून, प्रचाराला केवळ सहा दिवसांचा अवधी राहिला असल्याने उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला आहे. नात्यागोत्यातील मंडळी प्रचार कामात सक्रिय झाली आहेत. घरातील कामे सकाळी लवकरच उरकून ही मंडळी प्रचारासाठी गळ्यात पट्टा अडकवत सज्ज होत आहेत. मावळ तालुका हा भौगोलिक वाड्या-वस्त्यांचा व दुर्गम भागाचा असल्याने मतदारसंघ दूरवर पसरलेले आहेत. मतदारसंघातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे उमेदवाराला शक्य नसल्याने नात्यागोत्यातील मंडळींनी राजकारण बाजूला ठेवत प्रचारकार्यात उडी घेतली आहे. घरोघरी जाऊन प्रचारपत्रके वाटप करणे, भित्तिपत्रके चिकटवणे ही कामे बालचमू मोठ्या उत्साहात करत आहेत. अमुकतमुक हा आपला नातेवाईक आहे. या वेळी पक्ष व राजकारण बाजूला ठेवत नात्यातील मंडळीला मदत करा. शेवटी आपले ते आपले असते, असे सांगायला देखील नातेवाईक विसरत नसल्याने नात्यागोत्यातील राजकारणाला मावळात मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. नातेवाइकांप्रमाणेच गावकी व भावकीदेखील प्रचारात सहभागी झाली असल्याचे चित्र आहे. पक्ष कोणता का असेना, उमेदवार आपल्या गावातील आहे. आपल्या हाकेला तो केव्हाही धावू शकतो हा विचार मनात धरत सध्या गावकीचा प्रचार सुरू आहे. याकरिता अनेक राजकीय पक्षांनीदेखील उमेदवार निवडताना मोठ्या गावांना, तसेच मोठी भावकी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले आहे.सोशल मीडिया प्रचाराचे सर्वांत वेगवान साधन डिजिटायझेशनच्या जमान्यात सोशल मीडिया हे प्रचाराचे सर्वांत मोठे साधन बनले आहे. या प्रचारावर निवडणूक आयोगाची देखील खूपच कमी बंधने नसल्याने याचा मोठ्या प्रमाणात वापर करत उमेदवार घराघरांत पोहोचले आहेत. सोशल मीडियावर सातत्याने उमेदवार व त्यांचे विचार किती महान आहेत, याची माहिती देणारे बॅनर कार्यकर्ते पाठवत आहेत. सध्या सर्वच उमेदवारांनी स्वत:चा सोशल मीडिया सेल तयार केला असून, ज्या भागात प्रचार सुरू आहे, तेथील प्रचाराची छायाचित्रे व गर्दीचे फोटो तातडीने सोशल मीडियावर पाठवत आपल्या उमेदवाराला किती जनाधार आहे हे दाखविले जात आहे. सोमवारी सर्व उमेदवारांना चिन्ह मिळाल्याने उमेदवाराचे चिन्ह घरोघरी पोहचविण्याचे महत्त्वाचे कार्य सोशल मीडिया सेल पार पाडत आहे. (वार्ताहर)