शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगनगरीची वाढली श्रीमंती

By admin | Updated: May 4, 2016 04:32 IST

सेवाकर, प्राप्तिकर, केंद्रीय उत्पादन शुल्कातून शहरातून सहा हजार कोटी रुपये केंद्र शासनाच्या तिजोरीत जमा झाले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी सेवाकरात २० टक्के, तर

पिंपरी : सेवाकर, प्राप्तिकर, केंद्रीय उत्पादन शुल्कातून शहरातून सहा हजार कोटी रुपये केंद्र शासनाच्या तिजोरीत जमा झाले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी सेवाकरात २० टक्के, तर केंद्रीय उत्पादनशुल्काच्या रकमेत तब्बल ४० टक्के वाढ झाली आहे. शहर आणि परिसरातील औद्योगिक क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत आहे. परिणामी कर भरणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे चित्र आहे, असे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.पिंपरी-चिंचवड शहर व परिसरात आॅटोमोबाईल कंपन्या व आयटी कंपन्यांची संख्या मोठी आहे. २०१५-१६ या वर्षासाठी प्राप्तिकर विभागाला सुमारे अडीच हजार कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र उद्दिष्टापेक्षा ३३६ कोटी अधिकचे जमा झाले आहेत. सेवाकर आणि केंद्रीय उत्पादन शुल्काच्या माध्यमातून २०१५-१६ या वर्षात तीन हजार शंभर कोटींचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे.तसेच केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाकडे जमा झालेली रक्कम एक हजार पाचशे कोटी रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. शहरातील केंद्रीय उत्पादन शुल्क व सेवाकर चुकविणाऱ्या व्यक्तींचा आगामी काळात शोध घेऊन त्यांना नोटीस पाठविण्यात येणार आहे. दोन कोटी रुपयांच्या वर कर बुडविणारे किती आहेत याचाही शोध घेण्यात येणार आहे. २०१४-१५ या आर्थिक वर्षात केंद्रीय उत्पादन शुल्कातून नऊशे कोटी, तर सेवाकराच्या माध्यमातून एक हजार २८० कोटींचा महसूल जमा झाला होता. जमा झालेल्या या दोन्हीही करांत मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र आहे. प्राप्तिकर विभागाला या आर्थिक वर्षासाठी तीन हजार २० कोटी रुपयांचा कर जमा झाला आहे.(प्रतिनिधी)- या विभागाला या वर्षी दोन हजार ६८४ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मागील वर्षी या विभागाला अडीच हजार कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. करदाते वाढविण्यासाठी केंद्रीय उत्पादनशुल्क व प्राप्तिकर विभागाकडून विशेष मोहीम राबवण्यात आली होती. त्यामुळे या आर्थिक वर्षात दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा अधिकचा कर जमा करण्यास या विभागांना यश आल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहरातील नागरिक सतर्क झाल्याचे दिसत आहे. कर भरणा करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली असल्याचे चित्र दिसत आहे.