शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

चिंचवडमधील रस्त्यांवर वाढले अतिक्रमण

By admin | Updated: March 30, 2017 02:24 IST

पालिका प्रशासनाच्या अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष आणि वाहतूक शाखेचे अभय यामुळे चिंचवडमधील बहुतांश चौक आणि

चिंचवड : पालिका प्रशासनाच्या अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष आणि वाहतूक शाखेचे अभय यामुळे चिंचवडमधील बहुतांश चौक आणि रस्त्यांवर व्यावसायिकांचे अतिक्रमण वाढले आहे. सुसज्ज रस्ते बनविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र याच रस्त्यांवर व्यावसायिकांचे अतिक्रमण होत असल्याचे वास्तव सध्या चिंचवडमध्ये दिसत आहे. यामुळे होणारी वाहतूककोंडी आणि पादचाऱ्यांची गैरसोय याबाबत नागरिक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.चिंचवडमधील चापेकर चौक, अहिंसा चौक आणि पुणे-मुंबई महामार्ग या भागात रस्त्यांवरील वाढते अतिक्रमण ही गंभीर बाब आहे. अत्यंत वर्दळीचा असणारा चापेकर चौक सध्या वाहतूककोंडीमुळे त्रासदायक ठरत आहे. परिसरातील सर्वच रस्त्यांवर अतिक्रमण झाले आहे. येथील रस्ते पथारीवाले व हातगाडी व्यावसायिकांनी गिळंकृत केले आहेत. यामुळे या भागात वाहतूक समस्या गंभीर झाली आहे. येथील रस्त्यांवरून चालणे अवघड झाले आहे. अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष असल्याने दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत आहे.पुणे-मुंबई महामार्गाकडून चिंचवडगावाकडे येणाऱ्या दोन्ही मार्गांवर सम-विषम पार्किंग झोन ठरविण्यात आला आहे. मात्र वाहनचालक मनमानी पद्धतीने वाहन पार्क करीत असल्याने अडचणी वाढल्या आहेत. या भागात उभ्या असणाऱ्या वाहनांवर नियमित कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.पुणे-मुंबई महामार्गावर चिंचवड स्टेशन परिसरातील पादचारी मार्ग व मुख्य रस्त्यावरही व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे पादचाऱ्यांना मुख्य रस्त्यावरून चालावे लागते. येथील मुख्य रस्त्यावर खासगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने उभी केली जातात. (वार्ताहर) वाहतूक विभाग गप्प का?अहिंसा चौकातही परिस्थिती गंभीर आहे. सायंकाळी या चौकात अनेक खाद्यपदार्थांच्या हातगाड्या उभ्या केल्या जातात. यामुळे येथील रस्त्यांवर वाहतूक समस्या नित्याचीच झाली आहे. परिसरात अनेक नामांकित बँका, मोठे व्यावसायिक व शोरूम असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. खासगी कंपनीच्या ट्रॅव्हल्स गाड्या या भागात उभ्या केल्या जातात. यामुळे वाहतूककोंडीत भर पडते. या भागात पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जात नाही. चिंचवड वाहतूक विभागाचेही या प्रकारात दुर्लक्ष आहे. याबद्दल नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.