शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटी बंद होऊनही वाढले उत्पन्न, २०० कोटींची भर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 03:44 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील एलबीटीची वसुली बंद होऊन वस्तू आणि सेवाकर अस्तित्वात आला. या माध्यमातून महापालिकेला मिळणारे उत्पन्न सुमारे २०० कोटींनी वाढले आहे. वर्षाअखेरीस मुद्रांक शुल्क, एलबीटी आणि अनुदानातून १६२१.७८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील एलबीटीची वसुली बंद होऊन वस्तू आणि सेवाकर अस्तित्वात आला. या माध्यमातून महापालिकेला मिळणारे उत्पन्न सुमारे २०० कोटींनी वाढले आहे. वर्षाअखेरीस मुद्रांक शुल्क, एलबीटी आणि अनुदानातून १६२१.७८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.पिंपरी-चिंचवड ही औद्योगिक नगरी. महापालिकेला गेल्या वर्षी एलबीटीतून १४१० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. या वर्षी त्यामध्ये २११ कोटींची वाढ झाली आहे. महापालिकेला दर महिन्याला राज्य सरकारकडून मुद्रांक शुल्क मिळत होते. या आर्थिक वर्षात पहिल्या तीन महिन्यांत दीडशे कोटींचे अनुदान मिळाले आहे; तर एलबीटी प्रतिपूर्ती अनुदान पहिल्या तीन महिन्यांत दोनशे कोटी रुपये मिळाले आहेत.महापालिकेला दरमहा १२८ कोटी ९७ लाख रुपयांचे अनुदान मिळते. जीएसटी लागू झाल्यापासून गेल्या नऊ महिन्यांत महापालिकेला १०४६.१० कोटी रुपयांचे अनुदान राज्य सरकारकडून मिळाले आहे. या आर्थिक वर्षात एलबीटीतून महापालिकेला १६२२ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पन्नामध्ये २११.२५ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. मुद्रांक शुल्क आणि अनुदानातही वाढ झाली आहे. त्यामुळे उद्दिष्टापेक्षा दोनशे कोटींची भर उत्पन्नात पडली आहे.राज्य सरकारकडून महापालिकेला अनुदानएक जुलै २०१७ पासून देशभरात वस्तू व सेवाकराची (जीएसटी) अंमलबजावणी सुरू झाली. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही त्याची अंमलबजावणी सुरू झाली. त्यामुळे यापूर्वी वसूल करण्यात येणारा प्रवेशकर, स्थानिक संस्था कर, जकात, उपकर किंवा इतर सर्व कर बंद केले. त्यापोटी दर महिन्याला राज्य सरकारकडून पालिकेला अनुदान दिले जाते. एलबीटी बंद झाल्यावर उत्पन्न घटणार असे मत होते; मात्र, उत्पन्नात वाढ झाली आहे.

टॅग्स :GSTजीएसटीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड