शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

टक्केवारीसाठी अडवणूक

By admin | Updated: June 28, 2017 04:14 IST

गेल्या तीन महिन्यांत महापालिकेत लाचप्रकरणी अधिकारी व कर्मचारी यांना रंगेहात पकडण्याच्या तीन घटना घडल्या. त्यात आयुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : गेल्या तीन महिन्यांत महापालिकेत लाचप्रकरणी अधिकारी व कर्मचारी यांना रंगेहात पकडण्याच्या तीन घटना घडल्या. त्यात आयुक्त कार्यालयातील स्वीय सहायकाचाही सहभाग असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेत भ्रष्टाचार बोकाळल्याचे संकेत मिळाले असताना, महापालिकेचे मुख्य लेखापाल बिलांची रक्कम अदा करण्यास जाणीवपूर्वक विलंब लावत आहेत. बिले काढण्यासाठी ३ टक्के रकमेची मागणी केली जात असल्याच्या आरोप करीत ठेकेदारांनी थेट पंतप्रधानांच्या संकेतस्थळावर तक्रार नोंदवली आहे. त्याची दखल घेत पंतप्रधान कार्यालयाने पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून खुलासा मागितला आहे. यामुळे महापालिका वतुर्ळात एकच खळबळ उडाली आहे.महापालिकेचे मुख्य लेखापाल राजेश लांडे यांनी ३१ मार्च ही आर्थिक वर्षाची मुदत संपल्याचे कारण पुढे करत १६० कोटींची ठेकेदारांची बिले अडविली आहेत. राजेश लांडे सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत आहेत, असा आरोप विरोधकांनी केला आहे. ज्या ठेकेदारांची बिले रोखून धरली आहेत. त्या ठेकेदारांनी थेट पंतप्रधानांच्या संकेतस्थळावर तक्रार दिली आहे. त्यावर पंतप्रधान कार्यालयाने या तक्रारींची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त हर्डीकर यांच्याकडे खुलासा मागितला आहे. मुख्य लेखापाल ३ टक्के रकमेची मागणी करतात. याबद्दल तक्रारदारांनी काही पुरावे द्यावेत, असे आयुक्तांचे म्हणणे असून तक्रारदारांची माहिती मागवली आहे, अद्याप माहिती प्राप्त झालेली नाही. याप्रकरणी मुख्य लेखापाल लांडे यांच्याकडून खुलासा मागविला आहे. त्यांनी खुलासा दिला आहे. तक्रारदाराची माहिती प्राप्त होताच पंतप्रधान कार्यालयाकडे खुलासा पाठविला जाईल, असे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.