शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वाढत्या नागरीकरणामुळे प्रदूषणाची लागण

By admin | Updated: May 11, 2017 04:30 IST

पवना नदीचे निर्मळ स्वरूप उर्से, बेबडओहोळ औद्योगिक परिसर आणि सोमाटणे, उर्से, परंदवडी, धामणे, बेबडओहोळसह वाढती

लोकमत न्यूज नेटवर्कउर्से : पवना नदीचे निर्मळ स्वरूप उर्से, बेबडओहोळ औद्योगिक परिसर आणि सोमाटणे, उर्से, परंदवडी, धामणे, बेबडओहोळसह वाढती वस्ती असलेल्या भागात बदलत आहे. गेल्या पाच वर्षांत पवना नदीलगत गावातील लोकसंख्या वाढत असल्याने गावातील सांडपाणी मोठ्या प्रमाणात नदीला येऊन मिळत आहे. त्यामुळे आज पवना नदी संवर्धनाची गरज वाढू लागली आहे. सडवली ते शिरगाव दरम्यान नदीचा प्रवास उर्से औद्योगिक परिसर, सोमाटणे येथील नागरी भागातून जातो. त्यामुळे नदीप्रदूषण हळूहळू वाढताना दिसते. सडवली गावाची लोकसंख्या सातशेच्या जवळपास आहे. तेथे ७०० एकर शेतीचे जमिनीचे क्षेत्र असून, बागायत क्षेत्र १५० एकरापर्यंत आहे. उर्वरित ५५० एकरात प्रामुख्याने भातपीक घेतले जाते. नदी, विहिरीवरून गावात पाणीपुरवठा केला जातो. सांडपाणी नदीला जात नसले, तरी गावातील ४०० ते ५०० जनावरे नदीवरच धुतली जातात, असे येथील ग्रामस्थांनी सांगितले. फिल्टर प्लॅण्ट जरी नसला, तरी नुकतीच गावात पाणीपुरवठा योजना नळाद्वारे केली आहे. पुढे नदीकाठालगतच्या आढे गावाची लोकसंख्या ८००च्या जवळपास आहे. गावात ५०० जनावरे असून, ती नदीवर धुतली जातात. गावातील सांडपाणी नदीला न सोडता शेतात सोडले जाते. जागोजागी कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे नदीप्रवाह प्रदूषित होत नाही. कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे आढे गावातील नदीवर बांधले पाहिजेत, अशी मागणी काही ग्रामस्थांनी केली. उर्से हे पवनमावळातील जास्त लोकसंख्या असलेले व झपाट्याने वाढणारे गाव आहे. औद्योगिक परिसर असल्याने गावात महिंद्रा हिनोदय, फिनोलेक्स केबल, जयहिंद व इतर मोठ्या कंपन्या आहेत. मोठे वर्कशॉप आहेत. गावातील लोकसंख्या आठ हजारच्या आसपास असल्याने ओढ्यामार्गे गावातील सांडपाणी, कंपनीचे पाणी मोठ्या प्रमाणावर नदीला मिळते. त्यावर कसलीही प्रक्रिया केली जात नाही. येथूनच पवनेच्या प्रदूषणाला सुरुवात होते. या पाण्यामुळे नदीच्या पाण्याला दुर्गंधी येत असल्याचे नागरिकांनी सांगितले. बेबडओहळ नदीकाठी असल्याने गावातील सांडपाणी, गटारीचे पाणी थेट नदीत मिसळते. त्यामुळे उर्से व बेबडओहोळ गावाजवळ प्रदूषण वाढलेले दिसते. पाण्याचा रंगही बदललेला जाणवतो. पुढे या पाण्याचा फटका बसतो धामणे गावाला. धामणेजवळील परंदवडी गावाची वाढणारी वस्तीही नदी प्रदूषित करण्यास हातभार लावते. गेल्या तीन वर्षांत गावात वाढलेली बांधकामे, शैक्षणिक संस्था यामुळे लोकसंख्या तीन हजारांवर झाली आहे. सांडपाणी, गटारींचे पाणी ओढ्यामार्गे नदीला मिळते. गावाला उत्पन्न कमी असल्याने फिल्टरेशनसाठी योजना करता येत नाही. परंदवडीसह उर्से, बेबडओहोळ गावांनी प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना न केल्याने हा प्रश्न गंभीर झाला आहे. सडवली, ओझर्डे, आढे, उर्से, बेबडओहोळ , धामणे, परंदवडी येथे सात किमी अंतरावर सर्वाधिक प्रदूषण आहे. जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याची आवश्यकता आहे. नदीवर जलपर्णी नाही. ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे.