शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

वायसीएममध्ये लवकरच अद्ययावत आयसीयू विभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 03:24 IST

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) २५ खाटांचा अत्याधुनिक सोयींयुक्त अतिदक्षता विभाग (आयसीयू) सुरू केला जाणार आहे.

पिंपरी : महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) २५ खाटांचा अत्याधुनिक सोयींयुक्त अतिदक्षता विभाग (आयसीयू) सुरू केला जाणार आहे. यापूर्वी १५ खाटांच्या क्षमतेचा एकच आयसीयू असल्याने रुग्णांचे हाल होत होते. परंतु, गेल्या महिन्यात नव्याने १८ खाटांच्या बेडच्या दुसऱ्या वॉर्डची उभारणी केली आहे. लवकरच २५ खाटांचा तिसरा अतिदक्षता विभाग सुरू होणार आहे. यामुळे चिंताजनक रुग्णांवर तत्काळ उपचार करणे सोईचे ठरणार असल्याने रुग्णांना दिलासा मिळाला आहे.महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात शहरातून, तसेच इतर ठिकाणाहून येणाºया रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.रुग्णालयामध्ये अनेक विभाग उपलब्ध असून, अल्पदरात उपचार केले जातात. त्यामुळे जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या अनेक भागातून येथे रुग्ण उपचारासाठी येतात. यामुळे अनेकदा जागेअभावी रुग्णांची हेळसांड होत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. रुग्णालयात चिंताजनक रुग्ण सतत येत असल्याने त्याच्यावर तत्काळ उपचार करुन अतिदक्षता विभागात हलविण्याची गरज असते. परंतु, रुग्णालयात एकच आयसीयू विभाग कार्यरत असल्याने बहुतांश चिंताजनक रुग्णांवर सर्वसाधारण विभागात उपचार करण्याची वेळ प्रशासनावर येत होती. यामुळे आॅक्सिजन व इतर आवश्यक सुविधा वेळेत मिळत नसल्याने ते रुग्णांच्या जिवावर बेतण्याची शक्यता असते; परंतु, सद्य:स्थितीत आयसीयू वॉर्डची नव्याने उभारणी केल्याने रुग्णांना तत्काळ उपचार मिळणार आहेत. सध्या रुग्णालयातील दोन अतिदक्षता विभाग सुरू असून, तिसºया विभागाचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. नव्याने उभारण्यात आलेल्या आयसीयूच्या वॉर्डमुळे चिंताजनक रुग्णांवर रुग्णालयात उपचार करणे सोईचे होणार आहे.रुग्णालयात नेहमीच मोठ्या प्रमाणावर रुग्णांची गर्दी असते. रुग्णालयात क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण आल्यानंतर काही प्रमाणात अडचण निर्माण होत होती. नवीन अतिदक्षता विभाग सुरु झाल्याने रुग्णांची गैरसोय थांबणार आहे. तिसºया आयसीयूचे काम थोड्याच दिवसामध्ये पूर्ण होईल. त्यानंतर त्वरित तो विभाग रुग्णांसाठी सुरू केला जाईल.’’- डॉ. शंकर जाधव, वैद्यकीय उपअधीक्षक, वायसीएम रुग्णालय

टॅग्स :hospitalहॉस्पिटलpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड