शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

हद्दीच्या गोंधळाने फोफावले अवैध धंदे

By admin | Updated: April 9, 2016 01:39 IST

एरवी अपघातांमुळे सतत चर्चेत असणारा, तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून जाणारा तळेगाव दाभाडे-चाकण रस्ता पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध

तळेगाव स्टेशन : एरवी अपघातांमुळे सतत चर्चेत असणारा, तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून जाणारा तळेगाव दाभाडे-चाकण रस्ता पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध अर्थात गोरख धंद्यांमुळे ‘वाममार्ग’ बनला. पोलीस ठाण्यांच्या हद्दीच्या गोंधळाने येथे अवैध धंदे फोफावले आहेत. तळेगाव, चाकण, शिक्रापूर पट्ट्यातील वाढते औद्योगिकीकरण, मुंबईकडून मराठवाड्याकडे वाढलेली वाहतूक यामुळे तळेगाव-चाकण हा राज्य मार्ग क्रमांक ५५ रहदारीने ओसंडून वाहत असतो. परंतु, शासनाने सर्वच बाबतींत हा रस्ता वाऱ्यावर सोडल्यासारखा झाला आहे. ना सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष ना पोलिसांचा वचक अशी स्थिती आहे. रस्त्याचा बहुतांश भाग हा तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. माळवाडी ते सुधा पुलापर्यंत एमआयडीसी पोलीस ठाण्याची हद्द असली, तरी नेमकी टोलनाक्यापासून येलवाडी बाजूचा भाग चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. फक्त महामार्ग हा एमआयडीसी ठाण्याच्या हद्दीत मोडतो. पोलीस ठाणे थेट आंबी येथे आडमार्गी असल्याने, घटनास्थळी पोलीस अधिकारी पोहोचेपर्यंत, खबऱ्यामार्फत निरोप पोहोचून कुकर्मी गायब झालेले असतात. अधूनमधून वाटमारीच्या घटना सुरूच असतात. काही उघड होतात. मात्र, काही घटना पोलिसांकडूनच दाबल्या गेल्याचे दाखले वाहनचालकांकडून मिळतात. हद्दीच्या गोंधळाचा फायदा घेत या रस्त्यावर अनेक अवैध धंदेवाल्यांनी आपले बस्तान बसवले आहे. अवैध, तसेच बनावट दारूविक्री, गांजा, गुटखाविक्री राजरोसपणे सुरू आहे. पोलिसांच्या आशीर्वादाने वाहनांच्या बॅटऱ्या चोरणारी टोळी आणि त्या विकत घेणारे भंगारवालेदेखील माळवाडीजवळ दुकाने थाटून बसल्याचे बोलले जाते. मालवाहू गाड्यांमधून चोरी केलेला लोखंडी माल, लाकडी सामान विकत घेणारे भंगारवाल्यांचीही चलती आहे. नियम धाब्यावर बसवून रात्री अकरानंतर देखील बहुतांश हॉटेल बिनदिक्कत सुरू राहतात.गस्तीवर आलेली पोलीस गाडी थंड पाण्याच्या बाटल्या घेऊन मार्गस्थ होताना दिसते. याचबरोबर एमआयडीसी रस्त्यावरही अशाच प्रकारचे उद्योग राजरोसपणे सुरू असल्याचे दिसते. संबंधित पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही कोणी दखल घेत नसल्याने, आता पोलीस अधीक्षकांनी बाहेरील पथक पाठवून शहानिशा करून या अवैध धंद्यांवर कारवाई करावी, अशी परिसरातील रहिवाशांची मागणी आहे. (वार्ताहर)