शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

महिला सक्षम झाल्यास देशाची प्रगती

By admin | Updated: March 17, 2017 02:09 IST

महिला सर्व क्षेत्रांत सक्षम झाल्या, तरच देश सक्षम होईल. त्यासाठी सर्व महिलांनी सर्व क्षेत्रात सक्षम होणे गरजेचे आहे. महिला सबलीकरणासाठी महापालिकेच्या

पिंपरी : महिला सर्व क्षेत्रांत सक्षम झाल्या, तरच देश सक्षम होईल. त्यासाठी सर्व महिलांनी सर्व क्षेत्रात सक्षम होणे गरजेचे आहे. महिला सबलीकरणासाठी महापालिकेच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन महापौर नितीन काळजे यांनी केले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त संत तुकारामनगर, पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.कार्यक्रमास आयुक्त दिनेश वाघमारे, उपमहापौर शैलजा मोरे, माजी आमदार दिगंबर भेगडे, उपजिल्हाधिकारी मोनिका सिंग, नगरसदस्या सोनाली गव्हाणे, अश्विनी बोबडे, सुनीता तापकीर, रेखा दर्शिले, शर्मिला बाबर, सीमा चौघुले, निर्मला कुटे, सारिका मोराळे, सारिका बो-हाडे, निकिता कदम, मीनल यादव, सुजाता पालांडे, मनीषा पवार, सुलक्षणा शिलवंत धर, प्रियांका बारसे, संगीता भोंडवे, मुख्य लेखापरीक्षक पद्मश्री तळदेकर, सहायक आयुक्त आशादेवी दुरगुडे, चंद्रकांत इंदलकर, कामगार कल्याण अधिकारी अनिल जगदाळे, प्रशासन अधिकारी रेखा गाडेकर, कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी अंबर चिंचवडे, चारुशीला जोशी, रोहिणी गव्हाणकर, सीमा सुकाळे, अनिता मालपाठक, माया वाकडे, नयना दीक्षित माहिती व जनसंपर्कचे रमेश भोसले, किशोर केदारी उपस्थित होते. उपमहापौर शैलजा मोरे म्हणाल्या, ‘‘खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुले यांनी त्या काळात महिलांना सुशिक्षित केले. त्यामुळे पुढे सध्या उच्च शिक्षण घेऊ शकल्या. सध्या विविध क्षेत्रांत महिला उल्लेखनीय कार्य करीत आहेत. महात्मा फुले यांनी सावित्रीबाई फुले, तर डॉ. आंबेडकरांनी रमाई घडविली. महिलांना सर्व क्षेत्रांत सक्षम बनण्यासाठी पुरुषांनी त्यांना सर्वतोपरी मदत करावी.’’मुलींनी नव्या क्षेत्रात पदार्पण केले पाहिजे. महिला व बालकल्याण विभाग महिलांसाठी विविध योजना राबवीत असतात. त्या योजनांचा सर्व महिलांनी सर्वांगीण विकासासाठी लाभ घ्यावा. महिलांच्या सबलीकरणासाठी महापालिका विविध कार्यशाळा घेत आहे त्याचाही सर्व महिलांनी लाभ घ्यावा, असे आयुक्त वाघमारे यांनी सांगितले. मुख्य लेखा परीक्षक पद्मश्री तळदेकर, कामगार नेते सुभाष सरीन यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या हस्ते कविता माने यांच्या रांगोळी चित्रांचे व संध्या वाघ यांच्या काव्यओळी असलेल्या रेखाचित्रांचे उद्घाटन झाले. त्यानंतर हे विघ्नहर्ता बाप्पा मोरया रे, तसेच रिद्धी सिद्धी वृद्धी होती, तेरे ही आने से ही गणेशवंदना सादर करण्यात आली. या नृत्यकला कृतीमध्ये कविता माने, रुपाली निकम, कुमोदिनी आरु, सरिता कुलकर्णी व मीनाक्षी गरुड यांनी सहभाग घेतला होता. सांगता जितेंद्र भुरूक यांच्या गीतो का सफर या आॅर्केस्ट्राने झाली. प्रास्ताविक चंद्रकांत इंदलकर यांनी केले. सूत्रसंचालन चारुशीला जोशी यांनी, तर आभार रेखा गाडेकर यांनी मानले. (प्रतिनिधी)