शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सत्ताधारी भाजपाने पाणीपट्टीमध्ये तीनपट वाढ केल्याचा आरोप, दरवाढ मागे न घेतल्यास आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 02:53 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभेने केलेली पिण्याच्या पाण्याची दरवाढ ही तुघलकी असून, दरवाढ मागे न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा विविध राजकीय पक्षांनी दिला आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभेने केलेली पिण्याच्या पाण्याची दरवाढ ही तुघलकी असून, दरवाढ मागे न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा विविध राजकीय पक्षांनी दिला आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष पाच टक्के दरवाढ सांगत असला तरी नागरिकांसाठी असणाºया पिण्याच्या पाण्यात तिपटीने वाढ केली आहे. नागरिकांवर लादलेली दरवाढ रद्द करावी, अशी मागणी होत आहे.महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये आयुक्तांच्या प्रस्तावाला उपसूचना देऊन नळजोडाला मीटर असलेल्या प्रत्येक कुटुंबाला सहाहजार लिटरपर्यंत पिण्याचे पाणी मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. हा ऐतिहासिक निर्णय असून, मोफत पाणी देणारी राज्यातीलपहिली महापालिका असा दावा सत्ताधाºयांनी केला आहे. मात्र,याची खोलवर माहिती घेतली असता, ही योजना फसवी असल्याचे दिसून येत आहे. शिवसेना, राष्टÑवादी काँग्रेसनेही याबाबत आवाज उठविला आहे.हा विषय चर्चिला जात असतानाच पाणीपुरवठा लाभ करामध्येही दुपटीने वाढ करण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी तयार केला आहे. पाणीपुरवठा लाभ करात वाढ केल्यास वार्षिक सुमारे ३० कोटी रुपयांचे उत्पन्न वाढेल, असा अंदाज आहे. अमृत योजनेंतर्गत शहरात २४ तास पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. आंद्रा आणि भामा-आसखेड धरणातून ३०० एमएलडी पाण्याचा उपसा करण्यात येणार आहे. त्यासाठी सिंचन पुनर्स्थापना खर्च २३६ कोटी तसेच पुनर्वसन खर्च ७० कोटी रुपये सरकारकडे जमा करण्यात येणार आहे.या दोन्ही धरणातील पाणी चिखली येथील नियोजित जलशुद्धीकरण केंद्र्रापर्यंत आणण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे ५०० कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. त्यामुळे महापालिकेवर भविष्यात ८०६ कोटींचा बोजा पडणार आहे. त्यासाठी लाभ करामध्ये दुपटीने वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यावर बुधवारी होणाºया सभेत काय चर्चा होतय याकडे सर्व शहराचे लक्ष लागले आहे़ शहरातील पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. अनेक ठिकाणी पूर्णदाबाने पाणी येत नाहीत. त्यातच पाणीपट्टीत वाढीचा घेतलेला निर्णय अयोग्य असल्याचे मत सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त होत आहेत.भाजपाची बनवाबनवीप्रशासनाने पाणी मीटर व मीटर रीडिंग व स्लॅब पद्धतीने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. या मध्ये प्रति हजार लिटरला ५.५० रुपये इतका दर निश्चित केला होता़ मीटरसाठी चौदाशे नागरिकांच्या माथी मारण्यात येणार होते़ त्यावर आंदोलन केले व एका कुटुंबाला हजार लिटर आणि महिन्याला तीस हजार लिटर, अडीच रुपयाप्रमाणे दर आकारण्याचा निर्णय करून घेतला़तेव्हापासून आजपर्यंत मासिक ३० हजार लिटर पुरवठा केला जात होता. यासाठी त्या कुटुंबाला सरासरी पंच्याहत्तर रुपये एवढे मासिक बिलयेत होते. मोफत पाणीपुरवठ्याचे पॅकेज संपणार आहे.- मारुती भापकर, माजी नगरसेवकसत्ताधा-यांची धूळफेकस्थायी समितीने पाच टक्के पाणीपुरवठा दरवाढीचा प्रस्ताव मंजूर केला. त्यात नागरिकांना सहा हजार लिटरपर्यंत पिण्याचे पाणी मोफत देण्याची योजना जाहीर केली. ही योजना फसवी आहे. धूळफेक करणारी आहे. सहा हजार लिटरपर्यंत पाणी मोफत अशी घोषणा करीत असताना दरमहा प्रतिकुटुंब निश्चित केलेले शंभर रुपये पाणीपट्टीशुल्क सोयीस्कररीत्या लपविले हा भाजपाच्या पारदर्शक कारभार आहे का? सभागृहात हा विषय आल्यानंतर आमचा विरोध असणार आहे. ना खाऊंगा ना खाने दुँगा याप्रमाणे शहरवासीयांना आता ना पाणी पिणे दँुगा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.- राहुल कलाटे, गटनेते शिवसेनामोफत पाण्याचे गाजरविविध निविदांमध्ये टक्केवारी लाटून सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळविण्याचा प्रकार सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे. पाणीपट्टीत भरमसाठ वाढ करीत असताना सहा हजार लिटर मोफत पाण्याचे गाजर सत्ताधारी दाखवित आहेत. प्रत्यक्षात होणारी वाढ ही सर्वसामान्य नागरिक आणि विविध गृहनिर्माण सोसायट्यांना न परवडणारी आहे. त्यामुळे भाजपा सूज्ञ व्यक्तीचा पक्ष आहे, असे म्हणतात. त्यामुळे सूज्ञपणाचे वाभाडे निघणार नाही. त्यामुळे पक्षाची प्रतिमा खराब होईल. नागरिकांची फसवणूक होणार नाही. याची काळजी घ्यावी. मोफत पाणी योजना नवे गाजर आहे.- प्रशांत शितोळे, कार्याध्यक्ष राष्टÑवादी काँग्रेससध्या असणारे पाण्याचे दर० ते ३० हजार लिटर-प्रतिहजार २.५० रूपये३० हजार ते ५० हजार लिटर-प्रतिहजार ५.५० रूपये५० हजार ते ७५ हजार लिटर-प्रतिहजार १० रूपये७५ हजार लिटरच्या पुढे -प्रतिहजार १५ रूपयेवाणिज्यसाठी- प्रतिहजार ३५ रूपयेप्रस्तावित दर० ते ६ हजार लिटर- बील नाही६ ते १५ हजार लिटर-प्रतिहजार ८ रूपये१५ ते २२ हजार पाचशे लिटर-प्रतिहजार १५ रूपये२२.५०० ते ३० हजार लिटर-प्रतिहजार २५ रूपये३० हजार लिटरच्या पुढे -प्रतिहजार ३५ रूपयेवाणीज्य वापरासाठी ५० रूपये प्रति हजार लिटर

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड