शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मन स्थिर ठेवल्यास औषधांची गरज नाही - विलास जैन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 20:15 IST

८० टक्के समस्या मनातून येतात, तर मानसिक विचारातून आजार उत्पन्न होतात, त्यासाठी आपले मन स्थिर ठेवावे म्हणजे तुम्हाला औषधांची गरज लागणार नाही.

हनुमंत देवकर चाकण : “८० टक्के समस्या मनातून येतात, तर मानसिक विचारातून आजार उत्पन्न होतात, त्यासाठी आपले मन स्थिर ठेवावे म्हणजे तुम्हाला औषधांची गरज लागणार नाही. ध्यानामुळे ताण, चिंता, नैराश्य आणि वेदना कमी करण्यास मदत होते”, असे प्रतिपादन व्याख्याते विलास जैन यांनी केले. चाकण रोटरी क्लब आयोजित शेठ धनराजजी सांकला स्मृती व्याख्यानमालेत “ध्यान साधना, सक्षम जीवनशैली का राज” या विषयावर पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते.यावेळी ते म्हणाले,“आपल्या मुलांची इतर मुलांशी कधीही तुलना करू नका, म्हणजे तुमचा ताण कमी होईल. ध्यान हा आयुष्य जगण्याचा मार्ग आहे, ध्यान हे आपल्या रोजच्या जीवनशैलीचा एक भाग झाला पाहिजे, म्हणजे तो जीवनाचा एक मार्ग होईल, त्यामुळे मनाची स्थिरता निर्माण होईल. मन स्थिर नसेल तर चिडचिड होते व भावनिक स्थिरता नसेल तर ८० टक्के समस्या तेथून सुरु होतात, म्हणून आपले ध्यान, मन स्थिर ठेवावे.”यावेळी प्रमुख पाहुणे व व्याख्याते विलास जैन,रोटरी क्लबचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सातव, सचिव अतुल वाव्हळ, व्याख्यानमाला समितीचे चेअरमन सुहास गोरे, माजी अध्यक्ष नितीन पाटील, मोतीलाल सांकला यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व्याख्यनमालेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उद्योजक नितीन पाटील, अध्यक्ष माऊली सातव व नगरसेवक प्रकाश भुजबळ यांच्या हस्ते चाकण येथील दिव्यांग मुलगा कल्पेश भुजबळ यास तीनचाकी सायकल प्रदान करण्यात आली.यावेळी भगवान घोडेकर, विनय भुजबळ, दीपक करपे, महेश कांडगे, डॉ. शिवाजी एंडाईत, रमेश बोथरा, संभाजी सोनवणे, सुनील शहा, प्रवीण मुथा, प्रसाद हुलावळे, सुशीला सातव आदी मान्यवर उपस्थित होते.