शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

‘टेक्नोसॅव्ही’ प्रचाराची धूम शिगेला

By admin | Updated: February 14, 2017 02:03 IST

महापालिका निवडणुकांचा ज्वर सध्या टिपेला पोचला आहे. अवघे आठ दिवसच हातामध्ये राहिलेले असल्यामुळे अधिकाधिक मतदारांपर्यंत

पिंपरी : महापालिका निवडणुकांचा ज्वर सध्या टिपेला पोचला आहे. अवघे आठ दिवसच हातामध्ये राहिलेले असल्यामुळे अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठीची लगबग सुरू आहे. पदयात्रा, कोपरा सभा आणि थेट भेटीगाठींसोबतच उमेदवारांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा खुबीने वापर केला आहे. सध्या फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि संकेतस्थळांद्वारेही प्रचाराची धूम सुरू आहे. सोशल मीडियावर प्रभागांमध्ये केलेल्या कामांची माहिती देणाऱ्या, नाट्य रूपांतर असलेल्या अगदी एक-दोन मिनिटांच्या व्हिडीओ क्लिप्सही व्हायरल करण्यात येत आहेत.पुणे महापालिकेतील सभागृहामध्ये बरीच वर्षे गाजवलेले नगरसेवक यामध्ये आघाडीवर आहेत. निवडणुकांचा आणि पर्यायाने प्रचार मोहीम राबवण्याचा तगडा अनुभव या उमेदवारांच्या गाठीशी आहे. अलीकडच्या काळात सोशल मीडियाचा वापर करून प्रचारात आघाडी घेण्याकडे सर्वांचाच कल आहे. त्यासाठी बऱ्याच नगरसेवकांनी तसेच उमेदवारांनी त्यांच्या प्रभागातील मतदारांचे मोबाईल क्रमांक गोळा केले आहेत. या मोबाईल क्रमांकांच्या व्हॉट्सअ‍ॅपचे ब्रॉडकास्ट ग्रुप तयार केले आहेत. एका ब्रॉडकास्ट ग्रुपमध्ये साधारणपणे ३००च्या आसपास मोबाईल क्रमांक घेता येतात. उमेदवारांच्या निवडणूक कचेऱ्या आणि वॉर रूममधून अशा प्रकारे १0 ते ५० ब्रॉडकास्ट ग्रुप तयार करण्यात आले आहेत. या ग्रुप्सवर टाकलेला मेसेज, फोटो, व्हिडीओ आणि मतदानाचे आवाहन एकाच वेळी ३०० लोकांपर्यंत पोहोचत असल्यामुळे या सुविधेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे.फेसबुक हे नेटसॅव्ही वर्गाचे आवडते सोशल नेटवर्क आहे. प्रचारात कितीही व्यस्त असले तरी उमेदवार रात्री न चुकता सोशल मीडियाच्या दिवसभरातील वापराचा संध्याकाळी आढावा घेताना दिसत आहेत.