पिंपरी : चारित्र्याच्या संशयावरून गांधीनगर झोपडपट्टीत शनिवारी दुपारी ४च्या सुमारास पतीने डोक्यात हातोड्याचा घाव घालून पत्नीला ठार मारले. त्यानंतर गळ्यावर चाकूने वार करून स्वत:चे जीवन संपवले. पत्नीचा खून, पतीची आत्महत्या या घटनेने गांधीनगर, पिंपरी परिसरात खळबळ उडाली आहे. गांधीनगर झोपडपट्टीत राहणाऱ्या मुकिंदा तुक्कप्पा गायकवाड (वय ५०) याची पत्नी सुरेखाबरोबर वादावादी झाली. रागाच्या भरात चारित्र्याचा संशय व्यक्त करून पत्नी सुरेखा (वय ४०) हिच्या डोक्यात हातोड्याने वार केले. डोक्यात गंभीर इजा झाल्याने त्या जागीच कोसळल्या.(प्रतिनिधी)
पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या
By admin | Updated: September 13, 2015 01:37 IST