शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पुरुषांसारखेच महिलांनाही मानवी हक्क

By admin | Updated: February 20, 2017 02:37 IST

पुरुषांसारखेच महिलांनादेखील मानवी हक्क अधिकार आहेत. त्यांना आदर, प्रेम, आत्मीयता व समानतेची गरज आहे. महिला सबलीकरण

मोरवाडी : पुरुषांसारखेच महिलांनादेखील मानवी हक्क अधिकार आहेत. त्यांना आदर, प्रेम, आत्मीयता व समानतेची गरज आहे. महिला सबलीकरण किंवा सुरक्षा या गोष्टी कायद्यापर्यंतच मर्यादित न राहता महिलांना त्याची सुरुवात घर, शाळा व महाविद्यालयापासून करायला हवी, असे मत मुंबई उच्च न्यायालयचे न्यायाधीश डॉ. शालिनी फणसालकर-जोशी यांनी व्यक्त केले. एसएनबीपी विधी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित जेन्डर अ‍ॅन्ड लॉ या विषयावरील व्याख्यानात न्यायाधीश डॉ. फनसालकर-जोशी बोलत होत्या. एसएनबीपी महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला. या वेळी न्यायाधिश डॉ. फनसालकर-जोशी यांच्या हस्ते विधी सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमात सुभद्रा एज्युकेशनल सोसायटीचे संस्थापक, सचिव डॉ. डी. के. भोसले, अध्यक्ष वृषाली भोसले, संचालक प्राध्यापक सुनील शेवाळे व एसए़नबीपी महाविद्यालयाच्या प्राचार्या रोहिणी जगताप आदी उपस्थित होते. न्यायाधिश डॉ. फनसालकर-जोशी यांनी विद्यार्थ्यांना कौटुंबिक अत्याचारविरोधी कायदा, हुंडाविरोधी कायदा, वारसा हक्क, पोटगी, विधवा, हिंदु दत्तक कायदा आदी महिलांविष़यीच्या कायद्यांची माहिती दिली. सुधीर सूर्यवंशी व क्रिस्ती यांनी सूत्रसंचालन केले. प्राध्यापक कैलास पोळ यांनी आभार मानले. (वार्ताहर)