शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

घरखरेदी, गृहप्रवेशाने अनेकांनी उभारली गुढी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2016 01:44 IST

शहर परिसरामध्ये गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यात आला. मंदीचे सावट असतानाही शहरात लाखो रुपयांची उलाढाल झाली.

पिंपरी : शहर परिसरामध्ये गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यात आला. मंदीचे सावट असतानाही शहरात लाखो रुपयांची उलाढाल झाली. नागरिकांनी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. तसेच स्वत:च्या हक्काचे घरखरेदीलाही प्राधान्य दिले. काही जणांनी नव्या घरात प्रवेश केला. पाडव्यानिमित्त शहरातील बाजारपेठेमध्ये उत्साह जाणवत होता. नागरिकांनी सकाळपासूनच खरेदीसाठी गर्दी केली होती. इलेक्ट्रॉनिक्स दुकानदारांनी पाडव्यानिमित्त खास आॅफर ठेवल्या होत्या. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकानाची सजावट केली होती. यंदा उन्हाळ्यामुळे नागरिक हैराण आहेत. त्यापासून सुटका करण्यासाठी एसी खरेदी करण्यास प्राधान्य दिले. टीव्हीच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसत होती. हप्त्याने पैसे भरण्याची सुविधा काही कंपन्यांनी उपलब्ध करून दिली होती. त्याचाही फायदा ग्राहकांनी घेतला. राज्यभरात असलेले दुष्काळाचे सावट आणि जागतिक मंदीचा फारसा परिणाम बाजारपेठेवर झाला नसल्याचे जाणवत होते. अनेक बांधकाम व्यावसायिकांंनी पाडव्यानिमित्त घर घेण्यासाठी आकर्षक सवलती जाहीर केल्या होत्या. तर यापूर्वी नोंदणी केलेल्या ग्राहकांना सदानिकांचा ताबा दिला. त्यामुळे ग्राहकांचा आनंद द्विगुणित झाला. दुचाकी आणि चारचाकी गाड्या खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी शो-रुमच्या बाहेर गर्दी केली होती. त्यांनी यापूर्वीच गाड्यांची नोंदणी केली होती. पण पाडव्याच्या दिवशी गाडी ताब्यात घेतली. शहरातील मिठाई दुकानाच्या भोवतीही गर्दी दिसत होती. मिठाई दुकानदारांनी पाडव्यानिमित्त खास मिठाईचे बॉक्स बनविले होते. या वेळी अनेक जणांनी मिठाई देऊन एकमेकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. यानिमित्त मिठाई दुकानदारांनी सवलतीच्या दरामध्ये मिठाई विक्रीसाठी ठेवली होती. खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)