शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

बोपखेलकरांना प्रतीक्षा रस्त्याची

By admin | Updated: May 22, 2017 05:03 IST

संरक्षण खात्याच्या हद्दीत असलेल्या बोपखेल गावचा रस्ता संरक्षण खात्याने कॉलेज आॅफ मिलिटरी इंजिनिअरिंगच्या (सीएमई) व्यवस्थापनाने बंद केला

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : संरक्षण खात्याच्या हद्दीत असलेल्या बोपखेल गावचा रस्ता संरक्षण खात्याने कॉलेज आॅफ मिलिटरी इंजिनिअरिंगच्या (सीएमई) व्यवस्थापनाने बंद केला. हा रस्ता खुला व्हावा, या मागणीसाठी २१ मे २०१५ ला बोपखेल ग्रामस्थांनी आंदोलन केले. या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यात ४० लोक आणि १५ पोलीस जखमी झाले. दगडफेक झाली, त्यात जखमी होऊन एका पोलिसाचा मृत्यू झाला. या हिंसक आंदोलनाच्या जखमा अद्यापही भळभळताहेत.दापोडी ते बोपखेल असा सीएमईमधून जाणारा ३ किलोमीटरचा रस्ता १८ किलोमीटरचा झाला होता. दैनंदिन वापरासाठी दूर अंतर वळसा घालून जाण्यापेक्षा काहीतरी तोडगा काढावा, अशी मागणी झाली. उपाय म्हणून मुळा नदीवर खडकीच्या बाजूने तरगंता पूल एक महिन्याने सुरू करण्यात आला. मात्र, सुरक्षेचा मुद्दा पुढे करत ६ जून २०१६ ला तो पूलही काढून टाकण्यात आला. तत्कालीन संरक्षण मंत्री पर्रीकर, आमदार, खासदार, जिल्हाधिकारी, संरक्षण खात्याचे इतर अधिकारी नागरिक यांच्या वेळोवेळी बैठका झाल्या. मात्र, यावर अद्याप ठोस पर्याय शोधलेला नाही. जिल्हाधिकारी आणि आयुक्तांनी तीन रस्त्यांचे पर्याय ठेवले होते. त्यामध्ये सध्या बंद केलेल्या रस्त्याच्या बाजूने उंच सीमाभिंत बांधणे, सीएमईच्या आणि मुळा नदीच्या कडेने नवीन रस्ता तयार करणे आणि खडकीच्या बाजूने अ‍ॅम्युनेशन फॅक्टरीकडे निघण्यासाठी नदीवर पूल उभारून खडकीतील गवळीवाडा येथे मुख्य रस्त्याला जोड देणे असे पर्याय पुढे आले.