शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

झोपडपट्टी ‘निर्मल’ होण्याची आशा

By admin | Updated: June 30, 2017 03:41 IST

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील विविध झोपडपट्ट्यांच्या भागात उघड्यावर शौचास जाणे थांबविण्यासाठी बोर्डाच्या वतीने तातडीने फिरत्या

लोकमत न्यूज नेटवर्कदेहूरोड : कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील विविध झोपडपट्ट्यांच्या भागात उघड्यावर शौचास जाणे थांबविण्यासाठी बोर्डाच्या वतीने तातडीने फिरत्या शौचालयांची व्यवस्था करावी. इतर कॅन्टोन्मेंटपेक्षा देहूरोड कॅन्टोन्मेंट काहीसे मागे असून आणखी मोठा टप्पा गाठावयाचा आहे. अतिरिक्त शिक्षकांना पुणे व खडकी येथे पाठविण्याबाबत बोर्डाने निर्णय लवकर घेणे गरजेचे असल्याचे मत दिल्ली येथील रक्षा संपदा संचालनालयाचे महासंचालक जोजनेश्वर शर्मा यांनी येथे व्यक्त केले. महासंचालक शर्मा यांनी देहूरोड कॅन्टोन्मेंटला भेट दिली. त्या वेळी बोर्ड कार्यालयातील बैठकीत शर्मा बोलत होते. दक्षिण विभागाचे संचालक राजेंद्र पवार, भास्कर रेड्डी, केजेएस चौहान, संजीवकुमार, खडकी कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जगताप, कॅन्टोन्मेंट उपाध्यक्षा अ‍ॅड. अरुणा पिंजण, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित सानप, अर्थ समिती अध्यक्ष विशाल खंडेलवाल, सदस्य रघुवीर शेलार, सारिका नाईकनवरे, हाजीमलंग मारीमुत्तू, गोपाळराव तंतरपाळे, ललित बालघरे, अधीक्षक श्रीरंग सावंत उपस्थित होते. सुरुवातीला मुख्य कार्यकारी अधिकारी सानप यांनी बोर्डाच्या विविध विकासकामांची व इतर माहिती सादरीकरणाद्वारे दिली. उपाध्यक्षा पिंजण, सदस्य शेलार, खंडेलवाल व मारीमुत्तू यांनी लष्करी विभागाकडून येणााऱ्या समस्या विशद केल्या. रक्षा संपदा विभागाकडील जागांचे वर्गीकरण लवकर करण्याबाबत निर्देश देण्याची मागणी केली. बोर्डाकडून ठोस निर्णय घेतले जात असल्याचे गेल्या काही दिवसातील ठरावांवरून दिसून येत असल्याचे शर्मा यांनी निदर्शनास आणले. बोर्डाच्या वृक्षारोपण व रुग्णालयाबाबत समाधान व्यक्त केले. महासंचालक शर्मा म्हणाले, विभागनिहाय सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) राबविण्याची गरज आहे. २४ तास पाणीपुरवठा प्रकल्प तयार करण्यात आला असला तरी, तूर्त गरज असलेल्या भागात उपलब्ध पाणी पोहचविणेबाबत पावले उचलावीत. अतिरिक्त शिक्षकांबाबत निर्णय घ्यावा.