शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

पाडव्याच्या मुहूर्तावर घर, वाहनांचे बुकिंग

By admin | Updated: March 28, 2017 02:43 IST

साडेतीन मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा मुहूर्त मानलेल्या गुढीपाडवा उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी अनेकांनी नवीन

पिंपरी : साडेतीन मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा मुहूर्त मानलेल्या गुढीपाडवा उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी अनेकांनी नवीन घरांचे, तसेच मोटारींचे बुकिंग केले आहे. सण, उत्सवाच्या काळात बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर उलाढाल होत असते. मराठी नववर्षारंभ असल्याने या मुहूर्तावर व्यवसाय-उद्योगाची मुहूर्तमेढ रोवण्यास अनेकजण प्राधान्य देत आहेत. एकूणच व्यवसाय, उद्योगांचा शुभारंभ आणि नूतन वास्तू, मोटार, दागिनेखरेदी यामुळे नोटाबंदीनंतरच्या काळातही मोठ्या उलाढालीसाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे. गुढीपाडवा या सणाला हिंदू संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. या सणाच्या तोंडावर अनेकांनी हक्काच्या घराचे स्वप्न साकारण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. ज्यांच्याकडे स्वत:चे घर आहे, परंतु चारचाकी मोटार घ्यायची आहे, त्यांनी पाडव्याला सणाच्या दिवशी घरी मोटार येईल, या दृष्टीने तयारी केली आहे. कोणी दागिने खरेदीला प्राधान्य दिले आहे. कोणी घराचे स्वप्न साकार करण्याला महत्त्व दिले आहे. काहींनी व्यवसाय सुरू करण्यास हीच वेळ योग्य आहे, असे मानून नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक गुंतवणूक केली आहे. अगदी चहा-नाष्ट्याची टपरी ते मॉलच्या धर्तीवर सुरू केली जाणारी मोठी व्यावसायिक दालने यांच्या उद्घाटनासाठी गुढी पाडव्याच्या मुहूर्ताची अनेकांना प्रतीक्षा आहे. दुकान, शैक्षणिक संकुल, अकादमी, कार्यालय यांचा केवळ उद्घाटन समारंभ बाकी आहे. (प्रतिनिधी)