शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

हायटेक पालिकेत कामकाज पारंपरिक, लॅपटॉपचा होत नाही वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 06:28 IST

मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून नागरिकांनी महापालिकेकडे तक्रारी नोंदवाव्यात. सर्व कार्यालये ई-गव्हर्नन्सने जोडली असल्याने नळजोड, मिळकतकरभरणा, घरदुरुस्ती अर्ज आदी कामे घरबसल्या करणे शक्य असल्याचा दावा महापालिका प्रशासन करते. मात्र...

पिंपरी : मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून नागरिकांनी महापालिकेकडे तक्रारी नोंदवाव्यात. सर्व कार्यालये ई-गव्हर्नन्सने जोडली असल्याने नळजोड, मिळकतकरभरणा, घरदुरुस्ती अर्ज आदी कामे घरबसल्या करणे शक्य असल्याचा दावा महापालिका प्रशासन करते. मात्र, हायटेक महापालिकेत कामे मात्र जुन्याच पद्धतीने होत असल्याने कामकाज ढिम्मच असल्याचा अनुभव नागरिकांना पदोपदी येत आहे.महापालिकेच्या विविध विभागांचा एकमेकांशी योग्य प्रकारे समन्वय नाही. अधिकाºयांकडील लॅपटॉपवर नेमके काम काय केले जाते, याचा आढावा महापालिका आयुक्तांनी घेतल्याने अनेक बाबी पुढे येतील. कार्यालयात टेबलावर उच्च दर्जाचे संगणक आहेत. घरी तातडीच्या वेळी काम करता यावे, याकरिता महापालिकेने लॅपटॉप उपलब्ध करून दिले आहेत. असे असताना, वेळेचे महत्त्व न जाणणारे आणि संथगतीने काम करण्याची सवय जडलेले अधिकारी, कर्मचारी पूर्वीप्रमाणे मर्जीनुसार कामकाज करताना दिसून येतात.महापालिकेत सर्व प्रकारची अत्याधुनिक यंत्रणा असताना, साध्या कागदावर हस्तलिखित तयार करून माहिती प्रसारित करण्याचे काम केले जाते. साध्या कागदावर लिहिलेले निवेदन व्हॉट्स अ‍ॅपवर पाठवून आपली जबाबदारी संपली, अशा पद्धतीने काम करण्याची प्रथा अद्यापही रुजलेली आहे. क्रीडा क्षेत्रात महापालिकेचे चांगले काम आहे. भरीव कामगिरी केल्याचे सांगितले जात असताना, महापालिकेचे क्रीडा अधिकारी मात्र अद्यापही खेळांच्या स्पर्धांचे निकाल त्यांच्या सोईने अन् पारंपरिक पध्दतीने देतात.लॅपटॉपचा होत नाही उपयोग-जनसंपर्क विभागामार्फत वेळच्या वेळी माहिती प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचत नाही. विविध विभागांशी समन्वय नसल्याने त्या विभागांच्या प्रमुखांमार्फत त्यांना जसे जमेल, त्या पद्धतीने माहिती प्रसारित केली जाते. बांधकाम परवाना विभाग, नगररचना विभाग अपवाद वगळता अन्य विभागांतील अधिकारी संगणकाचा वापर करण्याऐवजी पूर्वीप्रमाणे कामकाज करतात. अधिकाºयांना महापालिकेने दिलेले संगणक त्यांच्या मुलांना गेम खेळण्यासाठी वापरात येऊ लागले आहेत. अनेक अधिकाºयांना अजूनहीइंटरनेटचा योग्य प्रकारे वापर करता येत नाही.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड