शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

गुंजवणीचे काम बंद पाडण्याचा इशारा

By admin | Updated: March 7, 2016 01:15 IST

वेल्हे तालुक्यातील गुंजवणी धरणग्रस्तांवर अन्याय झाला असून, संबंधित विभागाचे मंत्री व अधिकारी यांची संयुक्त बैठक घ्यावी, अशी मागणी धरणग्रस्तांनी केली आहे.

मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील गुंजवणी धरणग्रस्तांवर अन्याय झाला असून, संबंधित विभागाचे मंत्री व अधिकारी यांची संयुक्त बैठक घ्यावी, अशी मागणी धरणग्रस्तांनी केली आहे. आठ दिवसांच्या आत बैठकीचे आयोजन नाही झाले, तर तालुक्यातील सर्व पक्षांचे कार्यकर्ते व धरणग्रस्त शुक्रवार, दि. ११ रोजी धरणाचे काम बंद पाडणार, असा इशारा धरणग्रस्तांनी दिला आहे.याबाबत शुक्रवारी बैठक शिवगोरक्ष मंगल सभागृहात सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि धरणग्रस्त यांची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या वेळी धरणग्रस्त आक्रमक झाले आहेत. गुंजवणी धरणग्रस्तांवर अन्याय होत असल्याचा सुर या बैठकीत निघाला असून, राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याबाबत धरणग्रस्त नाराजी व्यक्त करीत आहेत. पुरंदरला पाणी नेता, तर पुरंदरला धरणग्रस्तांसाठी जमिनी का देत नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.अगोदर गुंजवणी धरणाचे पाणी वेल्हे तालुक्यात फिरवा, मगच इतरांना दिले जाईल. वेल्हे तालुक्यातील वाजेघर, वांगणी, सोंडे, निगडे, बोरावळे आदी भागांत सर्वत्र गुंजवणी धरणाचे पाणी फिरले पाहिजे. मगच इतरांना पाणी द्या. गुंजवणी धरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, सांडव्याचे कामसुद्धा अंतिम टप्प्यातच आहे. या वर्षी गुंजवणी धरणातील पाणीसाठ्यात वाढ होणार आहे. आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, की जर वेल्ह्यात जोरदार पाऊस झाला, तर गुंजवणी धरण क्षेत्रात भोसलेवाडी,कोदापूर व परिसरातील गावे पाण्यात जाणार आहेत.या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. येत्या आठ दिवसांत महसूलमंत्री एकनाथ खडसे, पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार संग्राम थोपटे आणि संबंधित खात्याचे सर्व अधिकारी यांच्यासोबत बैठक घ्यावी, अशी मागणी धरणग्रस्तांनी केली.आठ दिवसांच्या आत बैठकीचे आयोजन नाही झाले, तर तालुक्यातील सर्व पक्षाचे कार्यकर्ते व धरणग्रस्त शुक्रवार, दि. ११ रोजी धरणाचे काम बंद पाडणार, असा इशारा धरणग्रस्तांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन धरणग्रस्तांनी तहसीलदार रामलिंग चव्हाण यांना दिले आहे. या वेळी तालुक्यातील जनता व सर्व पक्षातील कार्यकर्ते-लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन धरणग्रस्तांनी केले आहे. या वेळी सभापती सविता वाडघरे, जिल्हा परिषद सदस्या वसुधा नलावडे, शंकर भुरुक, संदीप नगिने, गणपत देवगिरीकर, पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक भगवान पासलकर, शिवाजी कडू, नवनाथ राऊत, सचिन कोकाटे, सुनील कोकाटे, रघुनाथ राऊत, दत्तात्रय गेठले, प्रमोद कोकाटे, चंद्रकांत देशपांडे, दीपक देवगिरीकर, संपत मरळ, भिकाजी देवगिरीकर, सखाराम कातुर्डे आदींसह धरणग्रस्त उपस्थित होते.