शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका राबविणार ‘हेरिटेज वॉक’, चिंचवडला नवा लूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 01:11 IST

चिंचवडगावात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने ‘हेरिटेज वॉक’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

पिंपरी : चिंचवडगावात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने ‘हेरिटेज वॉक’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यामध्ये सुमारे पाच किलोमीटरच्या क्षेत्रात विशिष्ट प्रकारच्या दगडाचा वापर करून बांधलेला रस्ता, रस्त्यालगत दगडी बेंच, यासह मोरया गोसावी यांच्या इतिहासाची लघुचित्रफित, परिसरातील मंदिरांच्या माहितीचे सचित्र फलक यांचा समावेश असल्याने चिंचवडगावला पुरातन ‘लूक’ येणार आहे.चिंचवडगावात महासाधू मोरया गोवासी यांचे समाधी मंदिर तसेच चापेकर बंधूंचे स्मारक व चापेकर वाड्यामुळे ऐतिहासिक महत्त्व आहे. अशा या चिंचवडगावात आता ‘हेरिटेज वॉक’ हा प्रकल्प साकारला जाणार असून, याबाबत शहरवासीयांना उत्सुकता आहे. या प्रकल्पात चापेकर चौकापासून गुरुकुलमपर्यंतचा रस्ता, केशवनगर ते काळेवाडीपर्यंतचा रस्ता, चिंचवड गावठाण असा पाच किलोमीटर परिसराचा समावेश आहे. सुरुवातीला सुमारे ६० कोटी रुपयांची कामे करण्यात येणार आहेत.पेबल स्टोनचा रस्ता, ‘लाईट अन् साउंड शो’वाहने वेगाने जाऊ नयेत यासाठी ब्लॅक बसल्टचा वापर करून पेबल स्टोनचा रस्ता बनविण्यात येणार आहे. यासह चापेकर चौकात ‘हेरिटेज रूट’ दाखविणारा नकाशा उभारण्यात येणार आहे. तसेच या मार्गावरील मंदिर, ऐतिहासिक ठिकाणे, नदीघाट, उद्यान यांची माहिती देणारे विशिष्ट प्रकारचे फलकही ठिकठिकाणी उभारण्यात येणार आहेत. यासह गावातील जुन्या जलवाहिन्या, वीजवाहिन्या, सांडपाणी वाहिन्या बदलण्यात येणार असून, नवीन वाहिन्या टाकण्यात येणार आहे. हा प्रकल्प लखनौ, आग्रा या शहरांच्या धर्तीवर राबविण्यात येणार आहे. तसेच परिसरातील सर्व दुकानांना एकसारखे नामफलक लावण्यात येणार असून, जिजाऊ उद्यानाच्या पुढील भागात ‘लाइट आणि साउंड शो’ उभारण्यात येणार आहे. पवना नदीवर थेरगाव आणि चिंचवडच्या बाजूने गोलाकार पद्धतीचा पूल बांधण्यात येणार आहे.हेरिटेज प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेचे कामकाज सुरू आहे. या प्रकल्पातून चिंचवडगावाला पुरातन लूक देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या प्रकल्पातून चिंचवडगावचे ऐतिहासिक महत्त्व आणखी अधोरेखित केले जाणार असल्याने बाहेरील पर्यटकदेखील शहराकडे आकर्षित होतील.- चंद्रशेखर धानोरकर, उपअभियंता, महापालिका

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड