शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात गारांसह मुसळधार पाऊस

By admin | Updated: October 8, 2014 05:18 IST

शहराच्या काही भागात आज दुपारी गारांसह मुसळधार पाऊस झाला. अंदमानात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र, बिहारमधून परतलेला मॉन्सून आणि स्थानिक वातावरणातील बदलांमुळे हा पाऊस झाला

पुणे : शहराच्या काही भागात आज दुपारी गारांसह मुसळधार पाऊस झाला. अंदमानात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र, बिहारमधून परतलेला मॉन्सून आणि स्थानिक वातावरणातील बदलांमुळे हा पाऊस झाला. येत्या दोन दिवसांत दुपारनंतर मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेतर्फे वर्तविण्यात आली आहे.शहरात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी मात्र, ‘आॅक्टोबर हिट’च्या उन्हाच्या झळा तीव्रपणे जाणवत होत्या. तीनच्या सुमारास आकाशात ढगांनी दाटी केली. शहराच्या काही भागात दुपारी तीन वाजल्यापासून साडेचार वाजेपर्यंत विविध ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. अर्धा ते पाऊण तासाच्या या पावसाने हवेत गारवा निर्माण झाला होता. कसबा, शुक्रवार पेठेत काही ठिकाणी गारा पडल्या. पाऊस थांबल्यानंतर वातावरण पूर्ववत झाले आणि लख्ख ऊन पडले होते. राज्यातही तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकणात दापोली ४ मिमी, सावंतवाडी ३ मिमी, तर मध्य महाराष्ट्रात आजरा ३, सोलापूर, सिन्नर याठिकाणी एक मिमी पावसाची नोंद झाली. येत्या दोन दिवसांत कोकण-गोव्यात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.परतीचा मॉन्सून सुरू असला, तरी महाबळेश्वर वगळता तापमान सरासरीपर्यंत स्थिरावत आहे. त्यामुळे उन्हाच्या झळाही तीव्र आहेत. महाबळेश्वरमध्ये आज २६.३३ अंश तापमानाची नोंद झाली. राज्यातील काही शहरांच्या तापमानाची नोंद पुढीलप्रमाणे झाली. पुणे - ३२.९, जळगाव-३६.४, कोल्हापूर - ३३.१, मालेगाव - ३६, नाशिक -३१.९, सांगली - ३२.४, सोलापूर - ३४.३, औरंगाबाद - ३५.२, नागपूर ३३.१.