शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

टोमॅटोच्या लागवडीला उष्णतेचा फटका

By admin | Updated: May 7, 2014 04:25 IST

नुकत्याच लागवड झालेल्या टोमॅटोला वाढत्या उष्णतेचा फटका बसत असून, मर होण्याचे प्रमाण वाढत आहे. टोमॅटोचे पीक जगविण्याचा अटापिटा शेतकर्‍यांना करावा लागत आहे.

मंचर : आंबेगाव तालुक्यात अनेक शेतकर्‍यांनी टोमॅटोची अगाद (लवकर) लागवड केली आहे. नुकत्याच लागवड झालेल्या टोमॅटोला वाढत्या उष्णतेचा फटका बसत असून, मर होण्याचे प्रमाण वाढत आहे. टोमॅटोचे पीक जगविण्याचा अटापिटा शेतकर्‍यांना करावा लागत आहे. नगदी उत्पन्न मिळवून देणार्‍या टोमॅटो पिकाने दोन वर्षांपासून शेतकर्‍यांना चांगले पैसे मिळवून दिले आहेत. विशेषत: लवकर लागवड केलेल्या टोमॅटोला हमखास बाजारभाव मिळतो, असा शेतकर्‍यांचा अनुभव आहे. त्यामुळे टोमॅटोची अगाद लागवड केली जाते. पूर्वी घरी रोपे टाकून लागवड केली जायची. आता मात्र रोपवाटिकेतून तयार रोपे आणून टोमॅटोची लागवड केली जाते. मे महिन्यात लागवड मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसते. वातावरणात जास्त प्रमाणात उष्णता आहे. दिवसभर प्रखर ऊन असते, त्याचा परिणाम टोमॅटोपिकावर जाणवू लागला आहे. नुकतीच लागवड केलेल्या टोमॅटो रोपांची मर होऊ लागली आहे. अती उष्णतेने रोपांची मर वाढली असून, वाढ व्यवस्थित होत नाही. त्याचप्रमाणे अळी व रसशोषण करणार्‍या किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. या वातावरणात टोमॅटो पिकाचा निभाव लागणे अवघड आहे. ते जगविण्यासाठी शेतकर्‍यांची धडपड सुरू आहे. शेतकर्‍यांनी टोमॅटोपिकासाठी ठिंबक सिंचन केले आहे. तसेच पिकाला वारंवार पाणी द्यावे लागते. शेतकर्‍यांना महागड्या औषधांची फवारणी करावी लागते. फोटोओळी : तीव्र उष्णतेचा फटका नवीन लागवड झालेल्या टोमॅटोपिकाला बसत असून, मर होण्याचे प्रमाण वाढले आहे.