शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

डास मारण्याची ‘बॅट’ आयुक्तांना भेट, अस्वच्छ नदीपात्रामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 03:12 IST

गटारांची कामे अर्धवटच राहिल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात डासांचे साम्राज्य वाढले आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीच दखल घेतली जात नसल्यामुळे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक अतुल शितोळे आणि राजेंद्र जगताप यांच्यासह परिसरातील नागरिकांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देत डास मारण्याची बॅट भेट देण्यात आली.

पिंपळे गुरव - सांगवी-पिंपळे गुरव भागात नदीतील पाण्यात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे. महापालिकेकडून मुळा आणि पवना नद्यांची साफसफाई होत नाही. त्याचबरोबर गटारांची कामे अर्धवटच राहिल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात डासांचे साम्राज्य वाढले आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीच दखल घेतली जात नसल्यामुळे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक अतुल शितोळे आणि राजेंद्र जगताप यांच्यासह परिसरातील नागरिकांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देत डास मारण्याची बॅट भेट देण्यात आली.आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सांगवी-पिंपळे गुरव परिसरात मुळा आणि पवना नदी आहे. या नदीची साफसफाई होत नाही. त्याचबरोबर गटारांची अर्धवट कामे यामुळे या परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. मलेरियासारख्या साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. याला महापालिकेचा आरोग्य विभाग जबाबदार आहे. केंद्र आणि राज्य सरकारने स्वच्छ भारत अभियान राबविले आहे. लाखो रुपये जाहिराती, फलकबाजी, पत्रकबाजी यासाठी खर्च केले आहेत. प्रत्यक्षात मात्र स्वच्छता झालेली नाही. मुळा आणि पवना नदीमध्ये आजही कारखान्याचे रासायनिक पाणी, त्याचबरोबर भुयारी गटार योजनेचे काम पूर्ण न झाल्याने मैला आणि सांडपाणी थेट पवना नदीत सोडण्यात येत आहे. रासायनिक पाणी आणि मैलामिश्रित पाण्यामुळे अनेक वेळा मासे मेल्याचेही आढळून आले आहे. नदीतील जीवनसृष्टी यामुळे नामशेष होण्याचा मार्गावर आहे. कासट पेपर मिल आणि पद्मजी पेपर मिलचे पाणीही नदीत सोडले जाते. यामुळे मोठे प्रदूषण निर्माण होत आहे.नदीसुधार प्रकल्पाचे पुढे काय झाले माहिती नाही; मात्र आता नदीसुधार प्रकल्पाला गती देण्याची आवश्यकता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वच्छ भारत अभियान हे स्वप्न आहे. आपण स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास पंतप्रधानांचे स्वप्न कागदावरच राहील. त्यामुळे आपण स्वच्छतेकडे गांभीर्याने पाहा आणि गटाराची कामे पूर्ण करून नदी स्वच्छ करण्याचे कार्य हाती घ्या, असे निवेदनात म्हटले आहे.दरम्यान शहरातील इतर भागांमध्ये डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याचा त्रास परिसरातील नागरिकांना होत आहे. प्रशासनाने दक्षता घेण्याची गरज आहे.महापालिका प्रशासने याचा गांभीर्याने विचार केला नाही, म्हणून आज हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सांगवी आणि पिंपळे गुरव ही दोन्ही गावे नदीकाठी आहेत. संपूर्ण शहराची घाण या ठिकाणी येत असल्याने चंद्रमणीनगर, एस. टी. कॉलनी या भागात नदीतील पाण्यात दुर्गं धी पसरलेली आहे. शिवाय डासांचे साम्राज्य वाढल्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धुरीकरण आणि रासायनिक पावडर वापरली जाते. मात्र सांगवी-पिंपळे गुरव परिसरात याचा कधीच वापर केला जात नाही. मग हा कागदोपत्री खर्च दाखविला जातो का, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या