शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
3
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
4
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
6
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
7
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
8
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
9
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
10
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
11
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
12
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
13
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
14
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
15
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
16
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
17
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
18
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
19
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
20
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार

हुल्लडबाजांना लगाम घालणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 03:47 IST

बेदरकारपणे दुचाकी पळवायच्या... विनाकारण कर्कश हॉर्न... एका दुचाकीवर तीन-तीन जण... मोठमोठ्याने अर्वाच्य शिव्या... गुटखा, पान तोंडात चघळत उभी असणारी

- अनिल पवळ 

पिंपरी : बेदरकारपणे दुचाकी पळवायच्या... विनाकारण कर्कश हॉर्न... एका दुचाकीवर तीन-तीन जण... मोठमोठ्याने अर्वाच्य शिव्या... गुटखा, पान तोंडात चघळत उभी असणारी तरुणांची टोळकी... खाली मान घालून जावे लागणाºया विद्यार्थिनी हे चित्र सध्या पिंपरी-चिंचवड शहरातील बहुतांश सर्व महाविद्यालये आणि काही शाळांच्या बाहेर सर्रास पाहायला मिळत आहे. या हुल्लडबाजांना विद्यार्थिनी, पालकांसह आता शिक्षकही वैतागले असून, यांचा बंदोबस्त कोणी करणार की नाही, असा उद्विग्न सवाल विचारला जात आहे. ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीतून हा प्रकार उजेडात आला आहे. उद्योगनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराची ओळख आता ‘एज्युकेशन हब’ म्हणूनही होऊ लागली आहे. शहराबाहेरून, तसेच परराज्यांतून येथे विद्यार्थी शिकण्यासाठी येतात. अभियांत्रिकी, वैद्यकीय, तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रम शिकविणाºया महाविद्यालयांची संख्या वाढत आहे. शहर प्रशस्त आणि स्मार्ट असल्याने येथील महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाºया विद्यार्थिनींची संख्याही लक्षणीय आहे. मात्र, वाढत्या हुल्लडबाजांमुळे शहरातील शाळा, महाविद्यालयांचा परिसर असुरक्षित बनत चालल्याचे वास्तव सध्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे या हुल्लडबाजांच्या मुसक्या आवळणार तरी कोण, असा सवाल विद्यार्थिनी व पालकांकडून उपस्थित केला जात आहे. केवळ महाविद्यालयीन तरुणीच नव्हे, तर माध्यमिक शाळांच्या विद्यार्थिनींनाही या टवाळखोरांकडून त्रास दिला जातो. पोलीस खात्याकडून घातली जाणारी गस्त आलीकडच्या काही दिवसांमध्ये कमी झाल्याचे ‘लोकमत’ पाहणीतून दिसून येते. पोलीस गस्त झाली कमी...रोडरोमिओंकडून एखाद्या विद्यार्थिनीला त्रास दिल्याची घटना घडल्यानंतर पोलिसांकडून लगेच शाळा-महाविद्यालय परिसरामध्ये गस्त वाढविण्याचे जाहीर केले जाते. गस्त सुरूही होते. मात्र, ही गस्त एखादा महिनाच सुरळीत असते. दोन महिन्यांपूर्वी वाकडमध्ये अश्विनी बोदकुरवार या आमदारकन्या असलेल्या विद्यार्थिनीवर एका माथेफिरूने चाकू हल्ला केला. त्यानंतर लगेच पोलीस आयुक्तांनी गस्त वाढविण्याचे आदेश दिले. मात्र, सध्या मनमानी पद्धतीने गस्त घातली जाते. शैैक्षणिक संकुलाबाहेरच्या हुल्लडबाजांकडे कानाडोळा के ला जातो. त्यामुळे या टवाळखोरांचे उपद्व्याप वाढतच चालले आहेत. पोलिसांच्या गस्त पथकाने कारवाईमध्ये सातत्य ठेवण्याची मागणी विद्यार्थिनी, पालक, शाळा प्रशासन करीत आहे.  बाहेर गजबजाट अन्  आत शुकशुकाट... शहरातील महाविद्यालयांच्या बाहेर शेकडो विद्यार्थ्यांचा जथ्था पाहायला मिळत असतो. पाहणीदरम्यान, एका प्राध्यापकाशी चर्चा केली असता, त्यांनी सांगितले की, यातील २० टक्केच विद्यार्थी लेक्चरला असतात. बाकीचे सर्व असेच बाहेर हुल्लडबाजी करीत असतात. बहुतांश महाविद्यालयांची वेळ सकाळी पावणेआठ ते साडेबारा आहे. मात्र, काही बहाद्दर कॉलेजला जाण्यासाठी घरून दहाला निघतात. कॉलेजच्या आवारात तास-दीड तास हुल्लडबाजी, टवाळक्या करायच्या आणि घरी जायचे. हा त्यांचा दिनक्रम. त्यामुळे शाळेच्या बाहेर विद्यार्थ्यांचा गजबजाट दिसत असला, तरी वर्गांमध्ये मात्र शुकशुकाट असल्याची खंत महाविद्यालयांमधील प्राध्यापक व्यक्त करत आहेत. पालकांनी विद्यार्थी शाळेत गेल्यानंतर काय करतात, याची चौकशी करणे गरजेचे आहे.महाविद्यालयीन निवडणुकांसाठी वर्चस्वाचा प्रयत्नचालू शैैक्षणिक वर्षापासून विद्यार्थी प्रतिनिधी निवडण्यासाठी जाहीर निवडणूक घेण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घोषित केले आहे. महाविद्यालयीन निवडणुका म्हणजे राजकारणाचे प्रवेशद्वार मानले जाते. त्यामुळे अनेक राजकीय पदाधिकारी, तसेच व्यावसायिकांनी आपल्या पाल्यांना कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन दिला आहे. वर्चस्व राहिले पाहिजे, हा पालकांचा आदेश शिरसावंद्य मानून या मुलांकडून महाविद्यालयीन शिस्तीला मूठमाती दिली जाते. हे फक्त नावालाच विद्यार्थी असतात. ही मुले नेहमी आलिशान गाड्यांमधून येतात. सोबत शिक्षणाशी काही संबंध नसलेले तरु णांचे टोळके घेऊन प्रवेशद्वारावर ठिय्या मांडायचा. आपण किती ‘डॅशिंग’ आहोत, हे वेगवेगळ्या भांडणांमधून, मुलींना त्रास देऊन दाखविण्याचा प्रयत्न केला जातो. असे वर्चस्व प्राप्त करण्याच्या नादात दोन गटांमध्ये वादावादीचे प्रसंग होतात. आपल्या पक्षाचे वर्चस्व राहावे, म्हणून काही पुढाºयांकडून अशा हुल्लडबाजांना पाठीशी घातले जाते. माध्यमिक शाळांच्या मुलींनाही होतोय सर्वाधिक त्रास टवाळखोरांकडून केवळ महाविद्यालयाबाहेरच ठिय्या मांडलेला नसतो. महापालिकेच्या तसेच काही इंग्रजी माध्यमांच्या शाळांसमोरही रोडरोमिओ भटकत असतात. अल्पवयीन मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात सहज ओढता येते, असा त्यांचा समज असतो. त्यामुळे घरातून निघाल्यापासून शाळेत पोहचेपर्यंत त्या मुलीचा पाठलाग करून तिला त्रास दिला जातो.                                               तसेच या टवाळखोरांमध्ये अनेकवेळा अल्पवयीन मुलांचा समावेश जास्त असतो. आठवी, नववीमधून शाळा सोडून टवाळक्या करत ही मुले फिरत असतात. या मुलांकडे वाहन परवाना नसताना त्यांच्याकडून बेदरकारपणे वाहने पळवली जातात. पोलिसांकडून मात्र, अशा मुलांना केवळ समज देऊन सोडले जाते. आपल्यावर काहीच कारवाई होत नसल्याचे पाहून या टवाळखोरांची मजल वाढत जाते. निगडी, प्राधिकरण प्रवेशद्वारावरच ठिय्या१) प्राधिकरणातील भेळ चौकाशेजारील एका नामांकित महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच दुचाक ी अस्ताव्यस्तपणे उभ्या केल्या होत्या. त्या दुचाकींवरच गुटखा खात तरुणांचे टोळके बसले होते. या टोळक्याला हुसकावण्यासाठी महाविद्यालयाचे सुरक्षारक्षकही येत नव्हते. या प्रवेशद्वारातून बाहेर पडताना विद्यार्थिनींची मोठी पंचाईत होत होती. तसेच, महाविद्यालयाच्या समोरील रहदारीच्या रस्त्यावर आलिशान मोटारी उभ्या करून गप्पा मारणारे तरुणही पाहायला मिळाले. त्यामुळे रहदारीस रस्ता अपुरा पडत होता. मात्र, भीतीमुळे ‘कशाला फंदात पडा’ या विचाराने इतर नागरिक या तरुणांना वाहने बाजूला घेण्यास सांगत नव्हते. हा सर्व प्रकार सर्रास सुरू असताना गस्तीवरील पोलिसांची एकही फेरी परिसरात झाली नाही. आकुर्डी, दुचाकीवरून बेदरकारपणे घिरट्या२) येथील एका महाविद्यालय परिसरात एका दुचाकीवर तिघेजण बसून आवारात घिरट्या घालणारी अनेक अल्पवयीन मुले, तरुण पाहायला मिळाले. कनिष्ठ महाविद्यालय सुटले असल्याने विद्यार्थिनींच्या अगदी जवळून दुचाकी नेल्या जात होत्या. काही विद्यार्थिनींना धक्काही लागत होता. मात्र, वाद नको म्हणून मुली मुकाटपणे निघून जात होत्या. यातील काही मुले कर्कश हॉर्न वाजवत मुलींच्या मागे गाड्या पळवत होते. काही मुले महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर वाहने थांबवून तेथून ये-जा करणाºया मुली-महिलांवर शेरेबाजी करताना पाहायला मिळाले. बेदरकारपणे वाहन पळविणाºयांमध्ये अल्पवयीन मुलांची संख्या जास्त असल्याचे पाहायला मिळाले. चिंचवडगाव, शेरेबाजी करीत पाठलाग३) येथील एका शैक्षणिक संकुलाच्या बाहेर दुचाकीवर हुल्लडबाजांकडून वारंवार घिरट्या घातल्या जात होत्या. या शैक्षणिक संकुलात बालवर्ग ते कनिष्ठ महाविद्यालय आहे. माध्यमिक वर्ग सुटण्याची आाणि उच्च माध्यमिक वर्ग भरण्याची वेळ असल्याने विद्यार्थिनी आणि महिला पालकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होती. या वेळी हुल्लडबाज दुचाकीवरून कर्कश हॉर्न वाजवत येत होते. तसेच महिलांना व विद्यार्थिनींना स्पर्श होईल, अशा प्रकारे दुचाकी चालवत. मुली व महिलांच्या हा प्रकार लक्षात येण्याअगोदर हे तरुण पोबारा करतात. शिवाय माध्यमिक शाळेतील मुलींच्या मागे गाडी घेऊन जाणे व त्यांच्यावर शेरेबाजी करणे, हा प्रकार या शैैक्षणिक संकुलाच्या बाहेर सर्रास पाहायला मिळाला. पिंपरी, आलिशान मोटारीतून दहशतीचा प्रयत्न४) येथील दोन मोठ्या शैैक्षणिक संकुलाच्या आवाराची पाहणी केली. या ठिकाणीदेखील हुल्लडबाजांच्या लीला पाहायला मिळाल्या. पिंपरीतील साई चौैकाच्या पुढील शैैक्षणिक संकुलाबाहेरील बसथांब्यावर हुल्लडबाजांचे उपद्व्याप सुरू होते. महाविद्यालय सुटले असल्याने काही विद्यार्थिनी बसने घरी जाण्यासाठी थांब्यावर उभ्या होत्या. या वेळी काही रोडरोमियोंकडून त्यांच्या शेजारी दुचाकी थांबविल्या जात होत्या. तसेच त्यांना ऐकू जाईल, अशी शेरेबाजी सुरू होती. काही दुचाकींवर अल्पवयीन मुले ट्रिपल सीट घिरट्या घालताना पाहायला मिळाली. पिंपरीगावातील एका शैैक्षणिक संकुलाबाहेर आलिशान मोटारी आणि दुचाकी उभ्या करून घोळक्याने काही तरुण उभे होते. काही तरुण कर्कश हॉर्न वाजवत बेदरकारपणे दुचाकी दामटत होते. हा प्रकार रोजचाच असल्याचे काही विद्यार्थिनींनी सांगितले. या परिसरातही पोलिसांची गस्त पाहायला मिळाली नाही.