शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पतीकडून छळ : चारित्र्यावर संशय, नेपाळी महिलेची आकुर्डीत आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 01:00 IST

चारित्र्यावर संशय घेऊन पती छळ करीत असल्याने आकुर्डीत राहणाऱ्या नेपाळी महिलेने घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.

पिंपरी : चारित्र्यावर संशय घेऊन पती छळ करीत असल्याने आकुर्डीत राहणाऱ्या नेपाळी महिलेने घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. पवित्रा असे तिचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी या महिलेने मोबाइलमध्ये स्वत:चे संभाषण रेकॉर्ड करून ठेवले आहे. मृत्यूपूर्वी केलेल्या रेकॉर्डिंगच्या आधारे तिने आत्महत्या का केली याचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. ही घटना दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आली. सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळी कुटुंबीय आकुर्डीत वास्तव्यास आहे. पवित्राचा पती तिच्या चारित्र्याचा संशय घेत असे. तसेच मित्र-मंडळींत अपमान करीत असे. या मानहानीला कंटाळून तिने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने मोबाइलमध्ये स्वत:चे संभाषण रेकॉर्ड केले आहे. परंतु नेपाळी भाषेत तिने संभाषण रेकॉर्ड केलेले असल्याने पोलिसांना तिचे म्हणणे नेमके काय आहे, हे समजू शकले नाही. नेपाळी भाषेच्या जाणकाराकडून ते समजून घेतल्यानंतर आरोपीविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.दरम्यान शहर परिसरामध्ये आत्महत्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. त्यामध्ये विवाहितांचे प्रमाण जादा आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड