शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बांधकामांवर हातोडा

By admin | Updated: June 15, 2017 04:49 IST

पिंपरी-चिंचवड पालिकेतर्फे रहाटणी येथील उच्चक्षमता द्रुतगती मार्ग (एचसीएमटीआर) रस्त्यावरील अनधिकृत बांधकामावर शुक्रवार आणि शनिवारी धडक कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पिंपरी-चिंचवड पालिकेतर्फे रहाटणी येथील उच्चक्षमता द्रुतगती मार्ग (एचसीएमटीआर) रस्त्यावरील अनधिकृत बांधकामावर शुक्रवार आणि शनिवारी धडक कारवाई करण्यात येणार आहे. तत्पूर्वी नागरिकांनी स्वत:हून अनधिकृत बांधकामे पाडण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.रहाटणी येथे मंजूर विकास आराखड्यानुसार ३० मीटर रुंद उच्चक्षमता द्रुतगती मार्गाचे (एचसीएमटीआर) आरक्षण आहे. साई चौक ते रहाटणी येथे उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटरचे काम करण्यास कोकणे चौक ते काळेवाडी फाटा ३० मीटर एचसीएमटीआर मार्गाचा पर्यायी रस्ता म्हणून नियोजन केले आहे.याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि पिंपरी-चिंचवड प्राधिकरण नवनगर विकासचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश खडके यांची नुकतीच बैठक झाली. त्यानुसार रहाटणी येथील एचसीएमटीआर मार्गावरील अतिक्रमण, अनधिकृत बांधकामे काढून टाकण्याबाबत आयुक्तांनी सूचना दिल्या आहेत. महापालिका आणि प्राधिकरणाच्या मंजूर विकास आराखड्यानुसार तीस मीटर रुंद एचसीएमटीआरचा ६५ टक्के जागेचा ताबा असून, उर्वरित जागा ताब्यात घेण्याबाबत पालिका व प्राधिकरणामार्फतकारवाई करण्यात येणार आहे. या जागेवर विकास योजनेनुसार विकसित करण्याचे नियोजन आहे. वाल्हेकरवाडी ते रहाटणीपर्यंतच्या प्राधिकरणाच्या नियोजन क्षेत्रातील एचसीएमटीआर रस्त्याच्या आरक्षित जागेवरील अनधिकृत बांधकामावर कारवाई केली आहे.रहाटणी ते कासारवाडीपर्यंत एचसीएमटीआर रस्त्याच्या जागेचे आरक्षण पालिकेच्या हद्दीत येत आहे. या अनधिकृत बांधकामावर पालिकेतर्फे कारवाई करण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे रहाटणी येथील एचसीएमटीआरच्या रस्त्यावरील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येणार आहे. कारवाईच्या अगोदरच नागरिकांनी रहाटणी येथील प्राधिकरण हद्दीपासून कोकणे चौकापर्यंत तीस मीटर रुंद एचसीएमटीआर रस्त्यावरील अनधिकृत बांधकामे काढण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. दरम्यान वाल्हेकरवाडी ते रहाटणीपर्यंतच्या रस्त्याच्या जागेवरील अनधिकृत बांधकामावर कारवाई केली.