शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका घेणार एचएचा भूखंड

By admin | Updated: June 21, 2017 06:27 IST

हिंदुस्थान अ‍ॅण्टिबायोटिक्स (एचए) कंपनीची जागा विविध विकासकामांसाठी खरेदी करण्यात येणार असून, एचएची ५९ एकर जागा बहुउद्देशीय सार्वजनिक मैदान या

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : हिंदुस्थान अ‍ॅण्टिबायोटिक्स (एचए) कंपनीची जागा विविध विकासकामांसाठी खरेदी करण्यात येणार असून, एचएची ५९ एकर जागा बहुउद्देशीय सार्वजनिक मैदान या उद्देशासाठी आरक्षित करण्याचा निर्णय महासभेने घेतला आहे. पिंपरी-नेहरूनगर रस्त्यावर ७० एकर जागा एचए कंपनीच्या ताब्यात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कंपनी तोट्यात आणि कर्जबाजारी आहे. त्यामुळे कंपनीने आपल्या मालकीची जमीन खुल्या बाजारात विक्री करण्याची परवानगी सरकारकडे मागितली होती. ५९ एकर जमीन जिल्हाधिकाऱ्यांना योग्य वाटतील अशा सशर्त अटी-शर्तीवर विकण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार जमीन विकण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही जागा सार्वजनिक सुविधांसाठी पिंपरी महापालिकेला मिळावी, यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी याबाबतचा प्रस्ताव तयार केला असून, जून महिन्याच्या सर्वसाधारण सभेत तो मंजुरीसाठी ठेवण्यात आला. महापौर नितीन काळजे अध्यक्षस्थानी होते. एचएची जागा मंजूर विकास योजनेत बहुउद्देशीय सार्वजनिक मैदान म्हणून आरक्षित केल्यास नागरिकांना विविध सोयी-सुविधा पुरविणे शक्य होणार आहे. प्रदर्शन, सर्कस, लोक उपक्रम, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक, धार्मिक, व्याख्यानमाला, संगीत रजनी, राजकीय सभा, शैक्षणिक, सामाजिक उपक्रम, स्नेहसंमेलन, वाहनतळ, हेलिपॅड आदींसाठी या जागेचा उपयोग करता येईल. दहा टक्के क्षेत्र महापालिकेचे प्रशासकीय कार्यालय, असणार आहे.