शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कचरा टाकणा-याचे गुलाबपुष्पाने स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 02:45 IST

चिंचवडेनगर येथील शेखर चिंचवडे यूथ फाउंडेशन आणि नगरसेविका करुणा चिंचवडे यांच्या संयुक्त प्रयत्नातून रस्त्यावर कचरा फेकणाºया नागरिकांना गुलाबपुष्प देऊन कचरा न करण्याचे आवाहन गांधीगिरीच्या माध्यमातून केले.

रावेत : चिंचवडेनगर येथील शेखर चिंचवडे यूथ फाउंडेशन आणि नगरसेविका करुणा चिंचवडे यांच्या संयुक्त प्रयत्नातून रस्त्यावर कचरा फेकणाºया नागरिकांना गुलाबपुष्प देऊन कचरा न करण्याचे आवाहन गांधीगिरीच्या माध्यमातून केले.चिंचवडेनगर चौकात वाल्हेकरवाडी मार्गावर फत्तेचंद जैन विद्यालय, गुरुमैया विद्यालय आणि इतर विद्यालये आहेत. या चौकातून दररोज शेकडो मुले, महिला, नागरिक ये-जा करतात. पूर्वी या परिसरातून नाक मुठीत धरून प्रवास करावा लागत असे. कचराकुंडी भरून वाहत असे. रस्त्यावरून धोकादायकरीत्या मुलांना आणि महिलांना पायी प्रवास करावा लागत असे. मात्र नगरसेविका करुणा चिंचवडे यांच्या प्रयत्नातून येथील कचराकुंडी हलवून पदपथावर पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात आले. सुसज्ज फुटपाथ तयार करण्यात आला. वृक्षारोपण करण्यात आले. मात्र नेहमीप्रमाणे लोकांना विनंती करूनही नागरिक तेथेच थोड्या अंतरावर कचराकुंडी असतानादेखील कुंडीत कचरा न टाकता बिनधास्तपणे रस्त्यावर कचरा टाकीत असे. हे चित्र बदलण्यासाठी सकाळी सात वाजल्यापासून नगरसेविका चिंचवडे, शेखर चिंचवडे, गणेश बोरा, संस्कार प्रतिष्ठानाचे वसंत ढवळे, शिवाजीराव कामथे, शेखर चिंचवडे यूथ प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते कचरा टाकणाºया नागरिकांना गुलाबपुष्प देऊन कचरा न करण्याचे आवाहन करण्यात आले.आपणही रस्त्यावर/ गाडीवर जाताना कोठेही कचरा टाकू नका. कचरा टाकणाºया नागरिकांना एक सजग नागरिक म्हणून प्रबोधन करा, आपला परिसर स्वच्छ व सुंदर ठेवा, असे आवाहन करण्यात आले.रस्त्यावर कचरा फेकणाºया नागरिकांना गांधीगिरीच्या माध्यमातून कचरा न फेकण्याचे आवाहन करताना शेखर चिंचवडे यूथ फाउंडेशनचे कार्यकर्ते.