शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक इच्छुकांना मार्गदर्शन

By admin | Updated: January 24, 2017 22:52 IST

निवडणूक इच्छुकांना मार्गदर्शन

 

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७चे नामनिर्देशन पत्र व प्रतिज्ञापत्र आॅनलाइन भरण्यासाठी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व उमेदवारांची प्रशिक्षण कार्यशाळा झाली. अर्ज सादर करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त डॉ. यशवंतराव माने यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी येथील संत तुकारामनगर आचार्य अत्रे रंगमंदिरात झाली. या कार्यशाळेत सहायक आयुक्त अण्णा बोदडे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, नागरी सुविधा केंद्र चालक, सायबर कॅफेचे मालक, जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी, स्टॅम्प व्हेंडर, महापालिकेचे निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, तसेच महापालिकेचे सर्व कॉम्प्युटर आॅपरेटर व नागरिक उपस्थित होते.

या वेळी माहिती-तंत्रज्ञान विभागाकडील सुधीर बोराडे यांनी नागरिकांना आॅनलाइन पद्धतीने उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र व प्रतिज्ञापत्र भरणेकामी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संगणकाद्वारे सादरीकरण, तसेच दृक्श्राव्य माध्यमाद्वारे माहिती दिली. 

तसेच आॅनलाइन निवडणूक अर्ज भरण्याबाबतचे प्रात्यक्षिकही सादर केले. नागरिकांनी विचारलेल्या विविध शंकांचे निरसन मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांनी केले.  

पिंपरी : लोकशाही बळकटीसाठी युवकांची भूमिका अनन्यसाधारण आहे. सर्वच क्षेत्रांत युवक पुढे येत आहेत, ही लोकहितासाठी जमेची बाजू आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आपण सर्वांनीच क्रांती घडवून आणावी, असे आवाहन सहायक आयुक्त तथा मतदारनोंदणी अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी केले. 

महानगरपालिका व जिल्हाधिकारी कार्यालय,  पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय, आकुर्डी यांच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिन व मतदान जनजागृतीनिमित्त युवा महोत्सवाचे उद्घाटन प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय, आकुर्डी येथे झाले. त्या वेळी ते विद्यार्थ्यांना संबोधित करताना बोलत होते. या वेळी  प्रा. नितीन घोरपडे, मतदान जनजागृती मोहिमेच्या ब्रँड अम्बँसिडर मृण्मयी गोंधळेकर, डॉ. सुधीर बोºहाडे, डॉ. रंजिता चॅटर्जी, डॉ. सविता कुलकर्णी, सहायक आयुक्त अण्णा बोदडे, रमेश भोसले आदी उपस्थित होते.