शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

ऐन सणासुदीत डाळी कडाडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 02:03 IST

गणेशोत्सव अवघ्या सात दिवसांवर येऊन ठेपला असताना डाळी आणि कडधान्यांच्या किमती कडाडल्या आहेत.

पिंपरी : गणेशोत्सव अवघ्या सात दिवसांवर येऊन ठेपला असताना डाळी आणि कडधान्यांच्या किमती कडाडल्या आहेत. चणा, वाटाणा, मूग, हरबरा डाळ व मसूरच्या भावात १० ते १५ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे.श्रावण महिन्यात अनेक सणांची रेलचेल असते. त्यामुळे डाळींना मागणी वाढली आहे. त्यातच आयातीवर घालण्यात आलेली तात्पुरती बंदी यांमुळे घाऊक बाजारात कडधान्य व डाळींच्या भावात सुमारे पाच ते अठरा टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यातच बाजारात मालाचा तुटवडा निर्माण होताच काही व्यापाºयांकडून डाळींची साठेबाजी करून नफेखोरी करण्याचे प्रकारही सर्रास सुरू आहेत. याचाही प्रतिकूल परिणाम डाळींच्या किमतीवर पाहायला मिळत आहे.गेल्या दोन आठवड्यांपासून सणासुदीमुळे कडधान्य व डाळीला मोठी मागणी वाढली आहे. तसेच आयातीत डाळींवर बंदी घालण्यात आली. परिणामी आठवडाभरातच डाळी व कडधान्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. पंधरा दिवसांपूर्वी घाऊक बाजारात ५३०० ते ५५०० रुपये प्रति क्विंटल भावाने विकली जाणारी तूरडाळ आज ६६०० ते ७१०० रुपये क्विंटल इतकी झाली आहे. मूगडाळ, मसूरडाळ, उडीदडाळ, चणाडाळ यांच्या भावातही क्विंटलमागे पाचशे ते सातशे रुपयांनी वाढ झाली आहे. डाळींप्रमाणेच कडधान्यांच्या भावातही वाढ झाली आहे. ५५०० ते ५७०० रुपये क्विंटल भावाने मिळणाºया मुगाचा दर सध्या ६६०० ते ६७०० रुपये प्रति क्विंटल झाला आहे. त्याचप्रमाणे चणा, वाटाणा, मसूर, घेवडा, हुलगा, चवळी आदींच्या भावातही क्विंटलमागे दोनशे ते पाचशे रुपयांनी वाढ झाली आहे.>व्यापाºयांकडून साठेबाजीवास्तविक बाजारात मुबलक प्रमाणात माल असताना भाववाढ करण्याचे काहीही कारण नाही. मात्र, व्यापारी हवामान, आवक आणि मागणी याचा अंदाज घेऊन मोठ्या प्रमाणात साठेबाजी करतात. त्यामुळे मागणी वाढताच चढ्या भावाने मालाची विक्री करून मोठ्या प्रमाणात नफा कमवता येतो. व्यापाºयांच्या अशा कुटनीतीमुळे सामान्य नागरिकांना मात्र सणवार साजरे करताना काही प्रमाणात का होईना, हात आखडता घ्यावा लागत आहे. अन्न आणि औैषध प्रशासनाने अशाप्रकारे नफेखोरी करणाºयांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.