शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

फॅसिलिटी मॅनेजमेंटला द्या ‘इंडस्ट्रीज’चा दर्जा

By admin | Updated: December 9, 2015 00:14 IST

कंत्राटी कामगारांच्या माध्यमातून वेगवेगळ्या सेवा पुरविणाऱ्या फॅसिलिटी मॅनेजमेंट या खासगी संस्थांना इंडस्ट्रीचा दर्जा दिला जावा.

पिंपरी : कंत्राटी कामगारांच्या माध्यमातून वेगवेगळ्या सेवा पुरविणाऱ्या फॅसिलिटी मॅनेजमेंट या खासगी संस्थांना इंडस्ट्रीचा दर्जा दिला जावा. या संस्थांकडून लाखोंना रोजगार दिला जातो. मात्र, परदेशी कंपन्यांच्या स्वागतासाठी पायघड्या घालणारे सरकार त्यांना मात्र दुय्यम वागणूक देते, अशी खंत असोसिएशन आॅफ फॅसिलिटी मॅनेजमेंटच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. साफसफाई, सुरक्षा, माळीकाम, वैद्यकीय सेवा आदींसह विविध ठिकाणी फॅसिलिटी मॅनेजमेंट संस्था काम करतात. या संस्थांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या राज्यस्तरावरील असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ कार्यालयास सोमवारी भेट दिली. पदाधिकाऱ्यांनी लोकमतच्या व्यासपीठावर आपल्या समस्या आणि अडचणी मांडल्या. या वेळी असोसिएशनचे सचिव विनायक घोरपडे, खजिनदार महेश खेडकर, कार्यकारिणी सदस्य अमोल भोईटे, राघवेंद्र खेडकर, अरुण थोरात, जी. एम. कनोजिया आदी उपस्थित होते. कंत्राटी कामगारांना किमान वेतन ८ हजार रुपये आहे. ते वाढवून १५ हजार करावे. कंत्राटी कामगारांच्या मागण्यांकडे कंपन्या गांभीर्याने लक्ष देत नाहीत. संस्थांच्या माध्यमातून दर्जात्मक काम केले जाते. या संस्थांना इंडस्ट्रीचा दर्जा द्यावा. त्यामुळे अधिक चांगल्या पद्धतीने काम करता येईल. - विनायक घोरपडेफॅसिलिटी मॅनेजमेंटच्या माध्यमातून सेवा पुरविणाऱ्या सर्व संस्थांना आयएसओ ९००० प्रमाणपत्र आहे. सर्व प्रकारचे कर वेळेत आणि नियमित भरले जातात. कामगारांचे वेतन आॅनलाइन होते. भ्रष्टाचाराचा प्रश्नच येत नाही. कामगारांना अनेक सुविधा आणि सेवा, वेळप्रसंगी कर्ज पुरविले जाते. - महेश खेडकर