शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मुलींनी निर्भीडपणे पुढे यावे

By admin | Updated: January 9, 2017 02:06 IST

समाजात काही चुकीच्या गोष्टी अथवा गैरकृत्य होत असल्यास मुलींनी निर्भीडपणे पुढे यावे आणि आपल्या पालकांना व शिक्षकांना सांगावे

चाकण : समाजात काही चुकीच्या गोष्टी अथवा गैरकृत्य होत असल्यास मुलींनी निर्भीडपणे पुढे यावे आणि आपल्या पालकांना व शिक्षकांना सांगावे, असे आवाहन चाकण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी केले. कालच्या घटनेत मुलींनी न घाबरता शिक्षिकांना घडलेला प्रकार सांगितल्यामुळे एका आरोपीला पोलीस गजाआड करू शकले. त्या निर्भीड मुलींचे आम्ही कौतुक करतो, असे ते म्हणाले. ‘संवाद मनाशी, मनाचा’ या उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.मुलींनी व महिलांनी स्वसंरक्षणासाठी प्रतिसाद अ‍ॅप वापरावे. त्याची माहिती व निर्भया पथकाचे कार्य इंदुलकर यांनी उपस्थित विद्यार्थिनी, शिक्षिका व महिला पालकांना सांगितले. एखाद्या अडचणीच्या वेळी आपल्यावर एखादा प्रसंग ओढवल्यास अथवा अपघात किंवा एखाद्या घटनेची माहिती या अ‍ॅपद्वारे कळविल्यास पोलिसांची त्वरित मदत मिळते, असे त्यांनी सांगितले.अश्लील व्हिडीओ प्रकरणाबाबत मुली बोलत्या झाल्या व त्याबाबतची माहिती त्यांनी पोलिसांना कथन केली. एका मुलीने तर असे व्हिडीओ एक माणूस मुलींना दाखवीत असल्याचे घरी आईला सांगितले असता ‘असा काही प्रकार घडत नसतो,’ असे सांगून मुलीलाच दम दिल्याने मुलगी या कार्यक्रमात रडून सांगत होती. त्यामुळे तिने हा प्रकार कालच्या व्याख्यानातून जागृती झाल्याने शिक्षिकांना सांगितला.मुख्याध्यापिका सुनंदा गारगोटे म्हणाल्या, की कालच्या व्याख्यानात मुलींनी मोकळेपणाने संवाद साधल्याने ही घटना उघडकीस आली. हा इसम आपल्या घराच्या परिसरातही असे अश्लील व्हिडीओ दाखविण्याचे कृत्य करीत होता, तसेच इयत्ता दुसरी व तिसरीच्या मुलींपासून हे कृत्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी मुख्याध्यापिका सुनंदा गारगोटे, महिला दक्षता समितीच्या सदस्या मंगल देवकर, उपनिरीक्षक अर्चना दयाळ, निर्भया पथकातील महिला पोलीस पुष्पलता जाधव, हवालदार प्रवीण मुंडे, खेडकर, रोहिणी गव्हाणे, सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थिनी व पालक उपस्थित होते.(वार्ताहर)मुलींच्या नंतर महिला पालकांनाही पोलीस पथकाने मार्गदर्शन करून याबाबत जागृती केली. या वेळी महिला पालकांनी शाळेच्या गेटमधून मुलांना चॉकलेट दिले जातात, ते पालक असतात की कोण, हे कळतसुद्धा नाही, असे सांगून मुलींच्या सुरक्षेसाठी शाळा प्रशासनाने वॉचमन ठेवण्याची मागणी केली. तसेच बाहेरच्या शाळेतील मोठी मुले त्रास देत असल्यास तक्रारपेटीत चिठ्ठी लिहून टाकण्याचे आवाहन करून शिक्षकांना सांगावे, असे पोलीस उपनिरीक्षक अर्चना दयाळ यांनी सांगितले.