शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

दोन महिन्यांमध्ये नोंदणी करून मतदार व्हा

By admin | Updated: August 31, 2016 01:04 IST

महापालिका निवडणूकीसाठी पिंपरी, चिंचवड, भोसरी तीन विधानसभा मतदार संघाचा भाग येतो. तसेच मुळशी तालुक्याचाही काही भाग या शहरात येतो.

मतदार नोंदणीबद्दल सांगा.- महापालिका निवडणूकीसाठी पिंपरी, चिंचवड, भोसरी तीन विधानसभा मतदार संघाचा भाग येतो. तसेच मुळशी तालुक्याचाही काही भाग या शहरात येतो. निरंतर मतदार नोंदणीचे काम सुरू असते. मात्र, महापालिका निवडणूकीच्या निमित्ताने मतदार नोंदणीसाठी सप्टेंबर आणि आॅक्टोबरमध्ये विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये १ जानेवारी २०१६ रोजी १८ वर्ष पूर्ण होणाऱ्यांना यादीत समाविष्ट केले जाणार आहे. तसेच मतदार यादीत नावे समाविष्ठ करण्यासाठी शहरातील १६ महाविद्यालयांमध्ये समन्वयकांची नियुक्ती केली आहे. २०१२ च्या निवडणूकीमध्ये ११ लाख ५२ हजार मतदार होते. मात्र, मतदार याद्यांची दुरूस्ती मोहीमेमुळे मतदार संख्या कमी झाली आहे. मतदारांची संख्या घटली आहे?-गेल्या महापालिका निवडणूकीत साडेअकरा लाख मतदार होते. मात्र, मतदार याद्यांची दुरूस्ती करण्यात आली. दुबार, स्थलांतरित , मृत व्यक्तीची नावे तपासली. याद्या दुरूस्त केल्या. त्यातून चिंचवडमधून ८० हजार ७०१, पिंपरीतून ८४ हजार ९४३, भोसरीतून ४२ हजार ७४२ मतदार वगळण्यात आले. सुमारे सव्वा दोन लाख मतदार वगळल्याने आता ती संख्या १० लाख ६८ हजार ३७१ वर आली आहे. १६ जानेवारी २०१६ रोजी अपडेट केलेल्या याद्यांमुळे शहरातील मतदार संख्या ११ लाख ३ हजार ३७२ झाली आहे. जानेवारीपासून आणि आत्तापर्यंत आणि येत्या दोन महिन्यात नवीन मतदार नोंदणी होणार आहे. त्यामुळे साडेतेरा लाखापर्यंत मतदार होतील, असा अंदाज आहे. त्यामुळे मतदार संख्या घटलेली नाही.प्रभाग रचनेबद्दल सांगा?-महापालिका निवडणूक ही २०११ च्या जनगणेनुसार होणार असल्याचे निवडणूक आयोगाने कळविले आहे. शहरात ३१०२ जनगणनेचे प्रगणक गट होते. हेच गट गुगल अर्थच्या नकाशावर बसवून प्रारूप प्रभाग रचना तयार केली जाणार आहे.प्रारूप प्रभाग रचना तयार करून संबंधित प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर अंतिम प्रभाग रचना जाहिर होईल, त्यानंतर आरक्षणांची सोडत काढण्यात येणार आहे. मतदार याद्यांचे शुद्धीकरण हेही काम एका बाजूला सुरू राहणार आहे. त्यानंतर या वर्षाच्या शेवटी महापालिका निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर होणार आहे.मतदार केंद्र आणि नियोजन काय?-महापालिकेची होणारी निवडणूक चारसदस्यीय पद्धतीने असल्याने ३२ प्रभाग असणार आहेत.एका मतदारास अनेक मते देण्यासाठी लागणारा वेळ याचा विचार करता, एका मतदान केंद्रास ७०० मतदार जोडल्यास मतदार प्रक्रिया सुरळीत होईल, असे राज्य निवडणूक आयोगाने प्रस्तावित केले आहे. बहुसदस्यीय पद्धतीमुळे एका मतदान केंद्रावरील मतदार संख्या कमी केल्यामुळे शहरातील एकुण मतदार केंद्रामध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे १९५० मतदान केंद्र तयार करावी लागणार आहेत. त्याचे नियोजन केले असून कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण दिले आहे. अभियानाबद्दल सांगा?-मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार जागृती अभियान राबविले आहे. नागरिकांना देण्यात येणाऱ्या पाणीबीलांसोबत सुमारे सहा लाख पत्रके वाटण्यात आली. तसेच सर्व क्षेत्रीय कार्यालयांत मतदार साह्यता केंद्र सुरू केले आहे. महाविद्यालयांमध्येही मतदार नोंदणीची सुविधा केली आहे. - शब्दांकन : विश्वास मोरे