शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शहरात स्त्रीशक्तीचा जागर पोलीस ठाण्यातर्फे गौरव

By admin | Updated: March 9, 2016 00:32 IST

जागतिक महिला दिनानिमित्त शहरात विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि शासकीय संस्थांतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

पिंपरी : जागतिक महिला दिनानिमित्त शहरात विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि शासकीय संस्थांतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. आरोग्य तपासणी शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम झाले. शाळा-महाविद्यालयांमध्येही महिला दिनाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. विद्यार्थिनींसाठी मेंदी स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व चित्रकला स्पर्धांचे आयोजन केले होते. पिंपरी पोलीस ठाण्यातर्फे कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला. चिंचवड येथील अ‍ॅटो क्लस्टर सभागृहात कार्यक्रम झाला. या वेळी पोलीस परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त बसवराज तेली, सहायक पोलीस उपायुक्त मोहन विधाते, डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या मीनल पटवेकर, नगरसेविका सुजाता पालांडे, छाया साबळे, जयहिंद महाविद्यालयाच्या प्राचार्या ज्योतिका मलकानी, पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, पोलीस उपनिरीक्षक रत्ना सावंत व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. सावित्रीबाई फुले यांचे सन्मानचिन्ह देण्यात आले. कौटुंबिक समस्या निवारण झालेल्या दाम्पत्यांचा सन्मान करण्यात आला. महिलांसाठी स्वसंरक्षणाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. तसेच महिला व बालअत्याचार यावरील नाटिका सादर करण्यात आली. तसेच एम. अशोक यांचा हसरी मैफल कार्यक्रम सादर झाला. विद्यार्थ्यांचे समुपदेशन निगडीतील माता अमृतानंदनमयी मठाच्या वतीने अमृतचेतना या उपक्रमांतर्गत चिंचवड येथील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत शिकवणी घेतली जात आहे. याकरिता ज्येष्ठ समुपदेशक श्रीकांत पोहनकर यांचा वर्गही भरवला गेला. विद्यार्थ्यांसह पालकांशीही अतिशय मौलिक संवाद त्यांनी साधला. स्मरणशक्तीकरिता विविध पद्धतीचा अवलंब करीत त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. ताराबाई मुथा प्रशाला चिंचवड येथील कन्या प्रशालेत स्त्रियांच्या विविध विषयांवरच्या कविता शिक्षकांनी सादर केल्या. अ‍ॅड. राजेंद्र मुथा, अनिल कांकरिया, मीना बेंडाळे यांनी महिला दिनाचे महत्त्व सांगितले. स्त्रियांच्या विविध पैलू व्यक्त करणाऱ्या कविता व गायन सादर झाले. स्पर्धेत सारंगा भारती, कल्पना गोरडे, निर्मला नाईक, संगीता नहार, वंदना ताकभाते, संगीता नहार, पल्लवी दुसाने, अपर्णा बांदल, सुजाता चव्हाण, राजश्री कोटस्थाने, स्वाती नेवाळे, वैशाली जाधव यांनी कविता सादर केल्या. स्त्रीशक्ती सादरीकरण झाले. नववीच्या विद्यार्थ्यांनी बालिका गीत व बेटी बचाओ सादर केले. अंजू सोनावणे, विजया जोशी यांनी संयोजन केले. श्रद्धा जैन यांनी आभार मानले. यशस्वी विद्यालययशस्वी प्राथमिक विद्यालयात महिला पालकांना व विद्यार्थिनी डॉ. गौरी गावडे यांनी मार्गदर्शन केले. त्यामध्ये महिला पालकांची स्त्रीची भूमिका काय असते व स्त्रीने स्वत:कडे लक्ष काय असते, याची जाणीव करून दिली. सुभाष देवकाते यांनी शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापिका शोभा देवकाते यांनी मार्गदर्शन केले. माधुरी शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. भाग्यश्री भुजबळ यांनी आभार मानले. जयवंत शाळाचिंचवड येथील जयवंत प्राथमिक शाळेत डॉ. सपना गांधी यांचे महिलांचे आरोग्य, आहार व व्यायाम या विषयावर व्याख्यान झाले. मुख्याध्यापिका वंदना सावंत यांनी स्त्री स्वतंत्र व स्वावलंबी बनली पाहिजे, हे सांगितले. महिला पालकांच्या स्मरणशक्तीसाठी ‘खेळ जिंकणार कोण’? हा कार्यक्रम झाला. त्यामध्ये रिंग टाकणे, उखाणे स्पर्धा, संगीतखुर्ची घेण्यात आली. शबाना शेख व सुरेखा स्वामी यांनी संयोजन केले. नवनाथ साबळे शाळाभाटनगर येथील नवनाथ साबळे शाळेत सचिन साबळे, अभिजित कुंजीर यांनी शिक्षक महिलांचा सत्कार केला. महिलांसाठी केक कापून गुलाबपुष्प देण्यात आले. प्रभावती कांबळे, लक्ष्मी कुंजीर, गौतमी गायकवाड यांनी संयोजन केले. उषा चौधरी, उज्ज्वला चाळेकर, विद्या खुरंगे, यांनी सूत्रसंचालन केले. विद्या पवार व प्रतिभा चौधरी यांनी माहिती दिली. कल्पना सुतार यांनी आभार मानले. दिघी कन्या शाळादिघी येथील महापालिका कन्याशाळेतील कर्तबगार महिलांचा या वेळी सन्मान करण्यात आला. या वेळी शिक्षण मंडळाचे सभापती चेतन घुले, उपसभापती नाना शिवले, नगरसेवक चंद्रकांत कांबळे, सामाजिक कार्यकर्ते अरविंद लोखंडे, राजेंद्र तापकीर, अध्यक्षा मोहिनी जाधव, सुनंदा मुळे, मुख्याध्यापिका संध्या गवळी आदी उपस्थित होते नगरसेविका आशा सुपे, डॉ. दीपिका कदम, प्राध्यापिका सुषमा शिर्के, शारदा निंदानिया यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तुकाराम लांघी यांनी प्रास्ताविक केले. अविनाश वाळुंज यांनी सूत्रसंचालन केले. महात्मा फुले महाविद्यालयपिंपरीतील महात्मा फुले महाविद्यालयामध्ये, महात्मा फुले महावियालय आणि नव समाज युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन साजरा झाला. स्त्री- पुरुष समानतेबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शीतल आल्हाट यांनी मनोगत व्यक्त केले. प्रविण डोळस आणि सिद्धांत गागडे यांच्या पुढाकाराने कार्यक्रम साजरा झाला. नव समाज युवा मंचचे एच. व्यंकटेश, ऋषिकेश दिवेकर, अनिता भालेकर आदींनी पोस्टर प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक भोईटे, प्रा. अल्का चव्हाण, प्रा. दीपक बोरगावे, प्रा. दिनकर मुरकुटे यांनी मार्गदर्शन केले.आकुर्डीत कर्मचाऱ्यांचा सत्कार राष्ट्रीय सुरक्षा दिनाचे औचित्य साधून आझमभाई पानसरे युथ अण्ड सोशल वेलफेअर असोसिएशनच्या वतीने मंगळवारी आकुर्डी मधील हेडगेवार भवन येथे शहरातील सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार माजी महापौर आझम पानसरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी स्थायी समिती अध्यक्ष डब्बू आसवाणी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहाध्यक्ष संजोग वाघेरे, महिलाध्यक्षा सुजाता पालांडे, निलोफर पानसरे, नगरसेवक जगदिश शेट्टी, राजू मिसाळ, प्रसाद शेट्टी उपस्थित होते.(प्रतिनिधी)