शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

गाथा, ज्ञानेश्वरी हे ज्ञानकोषच

By admin | Updated: November 11, 2016 01:45 IST

संतांनी जाती-धर्म पाळले नाहीत. त्यांनी जातिव्यवस्थेवर आसूडच ओढले आहेत. ज्ञानेश्वरी आणि गाथा म्हणजे ज्ञानकोष आहेत

देहूगाव : संतांनी जाती-धर्म पाळले नाहीत. त्यांनी जातिव्यवस्थेवर आसूडच ओढले आहेत. ज्ञानेश्वरी आणि गाथा म्हणजे ज्ञानकोष आहेत, असे प्रतिपादन हभप शंकरमहाराज शेवाळे यांनी येथे दिवंगत माजी शालेय शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक मंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कीर्तनात केले. श्री संत तुकाराममहाराज संस्थान आणि ग्रामस्थांनी येथील शिवाजी चौकात आयोजित केलेल्या कीर्तनातून हभप शेवाळे यांनी विविध दाखले देत प्रा. मोरे यांचा जीवनपटच उलगडला. देहूकरांनी प्रा. मोरे यांच्या जयंतीनिमित्त कीर्तनाचे आयोजन करून आपला सांस्कृतिक वारसा जपण्याचा प्रयत्न केला आहे. ‘साहोनिया टाके घाय, पाषाण देवची झाला पाहे’ या अभंगाचे निरुपण करीत शेवाळे महाराजांनी प्रा. मोरे यांनी कसे जीवन व्यतीत केले याची माहिती दिली. ते कीर्तनात म्हणाले, ‘‘माणसाने नेहमी अवलोकन केले पाहिजे. अवलोकन करताना सिंहावलोकन करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे निर्णय चुकत नाही. संत तुकाराममहाराजांनी जगाला सर्वात प्रथम सज्जनांची निर्मिती कशी होते याचे विश्लेषण ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ या अभंगातून सांगितले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी माणसाच्या दु:खाची जन्म-मरणाचे दु:ख, दरिद्राचे दु:ख, रोगाचे दु:ख ही तीन कारणे सांगितली. प्रत्येक माणसाने संत तुकारामांची गाथा व संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीचा सखोल अभ्यास करावा. त्यामध्ये जेवढा खोलवर जाल तेवढे माणसाच्या हाती मोती लागतील. तर जेवढे वर जाल तेवढे तारे हाती लागतील एवढे अगाध ज्ञान देणारे हे ज्ञानकोष आहेत.’’प्रा. मोरे यांनी राजकीय जीवनात अनेक धाडसी निर्णय घेतले. निश्चय दृढ असल्याने विरोध पत्करूनही निर्णय घेतले. देवपण हे सहजासहजी येत नाही. त्यासाठी संघर्ष व कष्ट आहेतच. संसारात आपले जीवन व्यतीत करीत असताना आई घराचा कळस, तर बाप हा घराचा पाया आहे. हे जोपर्यंत भक्कम आहे, तोपर्यंत आपले जीवनही डळमळीत होणार नाही, असे शेवाळेमहाराज म्हणाले. (वार्ताहर)