शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेचा ‘कचरा’

By admin | Updated: May 6, 2017 02:24 IST

प्रशासकीय अनास्थेमुळे देशपातळीवर घेण्यात आलेल्या स्वच्छ शहरांच्या स्पर्धेत पिंपरी-चिंचवड महापालिका पिछाडीवर गेली

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : प्रशासकीय अनास्थेमुळे देशपातळीवर घेण्यात आलेल्या स्वच्छ शहरांच्या स्पर्धेत पिंपरी-चिंचवड महापालिका पिछाडीवर गेली आहे. याबाबत आरोग्य विभागातील अधिका-यांच्या अकार्यक्षमतेचा कचरा साफ करण्याची आवश्यकता आहे, अशी नाराजी शहरातील विविध पक्षीय नेत्यांनी व्यक्त केली. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाच्या यादीतील टॉप टेनमध्ये शहराचा देशात नववा क्रमांक आणि राज्यात पहिला क्रमांक आला होता. त्यामुळे स्वच्छतेबाबतच्या पिंपरी-चिंचवड पॅटर्नचा अभ्यास इतर शहरांनी केला होता. या वर्षीच्या निकालात पिंपरी-चिंचवड पिछाडीवर गेले आहे. देशात ७२ वा आणि राज्यात पिंपरीचा पाचवा क्रमांक आला आहे. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. भाजपाचे पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, ‘‘स्वच्छ भारत अभियान व स्वच्छ भारत स्पर्धेत शहराला कमी गुण मिळाले ही निश्चितच क्लेषदायी बाब आहे. हे मूल्यांकन झाले ते राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असतानाचे आहे. त्यांनी लक्ष न दिल्यानेच शहराला अपयश आले आहे.’’ स्वच्छतेच्या बाबतीत थेट ७२व्या क्रमांकावर घसरण झाली, ही लाजीरवाणी गोष्ट आहे. याला महापालिका अधिकारीच जबाबदार आहेत. त्यांनी लक्ष दिले नाही म्हणून अपयश आले. त्यांच्यामुळे शहरवासीयांची शरमेने मान खाली गेली आहे. कचऱ्याविषयी ज्या संस्था काम करतात. त्याच बोगस आहे. - नितीन काळजे, महापौर स्वच्छ शहरांच्या स्पर्धेत पिंपरी-चिंचवडला अपयश का आले, याची कारणे शोधून प्रभावी उपाययोजना केल्या जातील. पिंपरी-चिंचवड हे चांगले शहर असून, तीन गोष्टींवर भर देणार असून, घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे, वाहतूक व विघटन यावर लक्ष देणार आहे. दोन वर्षांत शहर कचरामुक्ततेसाठी प्रयत्न करेल. - श्रावण हर्डीकर, आयुक्त भाजपाच्या नाकर्तेपणाचे उत्तम उदाहरण आहे. केवळ अधिकाऱ्यांना जबाबदार धरून चालणार सत्ताधारीही तितकेच जबाबदार आहेत. महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे आणि प्रशासनाने याविषयी गांभीर्याने नियोजन केले नाही. परिणामी आपल्याला अपयश आले ही लाजिरवाणी गोष्ट आहे. यास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईची गरज आहे. - संजोग वाघेरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादीस्वच्छ स्पर्धेसाठी गुणांक झाले कमी स्वच्छ स्पर्धेबाबत लक्ष न दिल्याने गुणांकनात शहर पिछाडीवर गेले आहे. त्यामुळे देशातील टॉप टेनची पंरपरा खंडित झाली आहे. स्वच्छ शहराबाबतच्या स्पर्धेकडे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचेही दुर्लक्ष झाले. परिणामी गतवर्षींच्या गुणांमध्ये घट झाली. आरोग्य विभागाडेकही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे त्याचा त्रास नागरिकांना होत आहे.- राहुल कलाटे, शहरप्रमुख, शिवसेना महापालिकेत भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्यानंतर पहिली भेट शहरवासीयांना दिली आहे. स्वच्छ भारतमध्ये शहराचा कचरा केला. याला सत्ताधारीच जबाबदार आहेत. शहरातील कचरा कमी करण्यात सत्ताधाऱ्यांना अपयश आले आहे. शहरवासीयांसाठी अच्छे दिन जरी आले नाहीत, तर यापेक्षा बुरे दिन येऊ नयेत, याची दक्षता भारतीय जनता पक्षाने घ्यायला हवी.- सचिन साठे, शहराध्यक्ष, काँग्रेस