शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

कचरा गाडीत भरली माती

By admin | Updated: May 26, 2017 06:09 IST

पिंपरी-चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा गोळा करणाऱ्या ठेकेदाराने वजन वाढविण्यासाठी डंपरमध्ये चक्क माती भरल्याचा धक्कादायक प्रकार आज उघडकीस आला

लोकमत न्यूज नेटवर्कनिगडी : पिंपरी-चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा गोळा करणाऱ्या ठेकेदाराने वजन वाढविण्यासाठी डंपरमध्ये चक्क माती भरल्याचा धक्कादायक प्रकार आज उघडकीस आला. निगडीच्या नगरसेविका कमल घोलप यांनी हे प्रकरण उघडकीस आणले. मातीने भरलेला डंपर महापालिकेत आणला होता. महापालिकेच्या वतीने शहरातील नागरिकांचा घरोघरचा कचरा उचलला जात आहे. निगडी, ओटास्कीम येथून वजन वाढविण्यासाठी डंपरमध्ये (एमएच १२ आरए ९००३) गेल्या अनेक दिवसांपासून माती भरत असल्याच्या तक्रारी नगरसेविका कमल घोलप यांच्याकडे आल्या होत्या. आज कचरा गोळा करणारे कर्मचारी निगडी येथे डंपरमध्ये माती भरत आहेत, अशी माहिती मिळाली. त्यानंतर त्या घटनास्थळी पोहोचल्या. त्यांच्याकडे डंपरमध्ये माती का भरता, असे विचारले असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर हा डंपर त्यांनी महापालिकेत आणला. अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, आरोग्य अधिकारी मिनीनाथ दंडवते यांना या प्रकरणाची त्यांनी माहिती दिली आहे.या ठेकेदारावर कडक कारवाई करून काळ्या यादीत टाकण्यात यावे. तसेच या डंपरचे वजन किती आहे, याची माहिती घेऊन त्यांच्याकडून दंडाची रक्कम वसूल करण्याची मागणी नगरसेवक कमल घोलप, उत्तम केंदळे यांनी केली आहे. नगरसेवकांच्या तक्रारीनंतर संबंधित प्रकरणाची दखल घेतली आहे. कचरा गोळा करणाऱ्या संस्थेला नोटीस देण्यात येणार असून दंड आकारणी करण्यात येणार आहे, असे आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त मिनीनाथ दंडवते यांनी दिली.