शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

कचरा विघटन, खतनिर्मितीचा मंत्र; महापालिकेतर्फे प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 01:53 IST

घनकचऱ्यावर प्रक्रिया करणाºया ५० कंपनींनी घेतला सहभाग

पिंपरी : महापालिकेने शहरातील मोठ्या सोसायट्या, हॉटेल, उद्योगांचा ओला कचरा न उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ह्या कचºयाचे विघटन करायचे कसे, कचरा जिरवायचा कसा आणि कुठे असे अनेक प्रश्न शहरवासीयांपुढे आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे चिंचवड येथील आॅटो क्लस्टरमधील महापालिकेच्या कचरा विलगीकरण व खत निर्मिती प्रदर्शनातून मिळाली.महापालिकेच्या वतीने प्रदर्शन भरविले आहे. तीन दिवसीय प्रदर्शनाला आजपासून सुरुवात झाली. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर उद्घाटन सत्र रद्द करण्यात आले. या वेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सहायक आयुक्त अण्णा बोदडे, मनोज लोणकर तसेच आरोग्य विभागातील अधिकारी यांनी प्रदर्शनाला भेट दिली. या प्रदर्शनामध्ये घनकचºयावर प्रक्रिया करणाºया पन्नास नामांकित संस्था सहभागी झाल्या आहेत. कचरा व्यवस्थापन, तंत्रज्ञानाविषयी जागरूकता वाढवणे आणि नागरिक, व्यावसायिक, मोठ्या सोसायट्या यांनी कचºयावर प्रक्रिया करणे आणि त्याचा पुनर्वापर कसा करावा याबाबतची माहिती प्रदर्शनाच्या माध्यमातून दिली जात आहे.घरात दररोज तयार होणाºया कचºयाचे जैविक खतात कसे रूपांतर करावे आणि स्वच्छतेबाबत प्रत्येक नागरिकाची असलेली जबाबदारी आणि कर्तव्य याबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले जात आहे. आपले घर, आपली सोसायटी आणि आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी काय करता येईल याबाबतच्या माहितीची देवाण-घेवाण तसेच कचºयावर प्रक्रिया करण्यासंदर्भातील अद्ययावत यंत्र सामग्रीबाबत माहिती प्रदर्शनाच्या माध्यमातून शहरवासीयांना दिली. कचरा व्यवस्थापनाच्या जनजागृतीसाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे.आश्चर्यकारक : स्वयंपाकाच्या गॅसची निर्मितीप्रदर्शनामध्ये कचºयापासून हरित ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प लक्षवेधी ठरला आहे. कचरा टाकण्याची एक टाकी आणि गॅस साठवण्याचा फुगा याच्या मदतीने स्वयंपाकाचा गॅस निर्मिती करण्याचे तंत्रज्ञान नागरिकांना आचंबित करत आहे. वीज अथवा कोणत्याही बाह्य स्रोताचा वापर न करता केवळ कचºयापासून गॅस निर्मितीमुळे गॅस सिलिंडरच्या किमती कितीही वाढल्या तरी त्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही. यामुळे कचºयाच्या विल्हेवाटीबरोबरच गॅस उपलब्ध होत असल्याने त्यावरील खर्चातही बचत होत आहे.कचराकुंडी नव्हे शो पिस!मातीच्या आकर्षक भांड्यांची उतरंड रचून त्यात ओला कचरा टाकून त्यातून खत निर्मितीचा अनोखा प्रकल्प प्रदर्शनात सादर केला आहे. ही मातीची भांडी शो पिस सारखी दिसतात. कोको पीठ, कागद आणि किचन वेस्टच्या साहाय्याने कंपोस्ट खत तयार केले जात आहे. यासाठी तज्ज्ञांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जात आहे. त्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडGarbage Disposal Issueकचरा प्रश्न