शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

तृतीयपंथीयांना आरतीचा मान, घारजाई माता फळभाजी मंडई संघटनेचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 01:44 IST

रुपीनगर येथील श्री घारजाई माता फळभाजी मंडई संघटना व भाऊसाहेब काळोखे युवा मंचतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त ‘मार्केटचा राजा’ गणेशाची आरती तृतीयपंथीयांच्या हस्ते करण्यात आली.

तळवडे - रुपीनगर येथील श्री घारजाई माता फळभाजी मंडई संघटना व भाऊसाहेब काळोखे युवा मंचतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त ‘मार्केटचा राजा’ गणेशाची आरती तृतीयपंथीयांच्या हस्ते करण्यात आली. त्यांचा या वेळी सन्मान करण्यात आला. यामुळे तृतीयपंथी आनंदाने भारावले होते.या वेळी नगरसेविका पौर्णिमा सोनवणे, रवींद्र सोनवणे, स्वप्निल काळे, हेमंत नेटके, अक्षय तांबे, बाळासाहेब बनसोडे, विजय मळेकर, गणेश वाघमारे, भागवत भोई, अविनाश डोंगरे, वैभव सकपाळव तृतीयपंथी अमित म्हस्के, दीक्षा म्हस्के, वरविना म्हस्के आदी उपस्थित होते.तृतियपंथीयांनाही मन, भावना, विचार आहेत, त्यांना समाजात समानतेची वागणूक मिळाली पाहिजे, कोणताही भेदभाव न करता त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून विकासाची समान संधी मिळावी म्हणून आम्ही गणेशाची आरती तृतीयपंथीयांच्या हस्ते घ्यावी, असा मंडळात प्रस्ताव मांडला. त्याला सर्व सभासदांनी संमती दर्शविली, असे मंडळाचे अध्यक्ष भाऊसाहेब काळोखे यांनी सांगितले.तृतीयपंथी अमित म्हस्के यांनी आपल्या भावना व्यक्त करताना आरतीचा मान दिल्यामुळे मनस्वी आनंद झाला असून, आम्हाला आई- बाप आहेत, पण कोणाचा आधार नाही. या उपक्रमाद्वारे आम्हाला समाजाच्या मुख्य प्रवाहात घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. समाजाने आम्हाला माणूस म्हणून जगण्याची संधी द्यावी. आमच्याकडे चांगल्या नजरेने बघावे. भावना समजून घ्याव्यात, असे आवाहन केले.रवींद्र सोनवणे म्हणाले, तृतीयपंथीयांना आरतीचा मान देऊन एक स्तुत्य पायंडा सुरू केला आहे. त्याचा आदर्श घेऊन विविध सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळांनी अशा दुर्लक्षित घटकांना समाजाच्या प्रवाहात आणावे.’’असा उपक्रम राबविणारे परिसरातील एकमेव गणेश मंडळ असून, त्यामुळे समाजात एकोप्याची भावना निर्माण होईल़

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड