शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

कष्टक-यांच्या मागण्यांसाठी मंत्रालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 03:14 IST

कष्टकरी संघर्ष महासंघ व महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान महामोर्चा काढण्यात आला.

पिंपरी : कष्टकरी संघर्ष महासंघ व महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान महामोर्चा काढण्यात आला. या वेळी पुणे, पिंपरी-चिंचवड, सातारा, नागपूर, कोल्हापूर सह विविध ठिकाणच्या असंघटित कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले. या महामोर्चास सकाळी ११ वाजता सुरुवात झाली. महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांचे मार्गदर्शनात झालेल्या या आंदोलनात अनिल बारवकर, राजू बिराजदार, साईनाथ खंडीझोड, इरफान चौधरी, सुरेश देंडे, दीपक पाचपुते, गणेश शिंदे, ज्ञानदेव लगाडे, इरफान मुल्ला, नागनाथ लोंढे, शशिकला ढवळे, जयश्री निरवने, पार्वती शिंदे, अरुणा सुतार, सरिता वाढोरे, मीना जाधव, राजू हाके, कासीम तांबोळी, उमेश डोर्ले, अनिलमुकी, शेषनारायण खंकाळ, संजय यवलेकर, हणमंत चाल्लावर, नारायण कलाल, सय्यद आली, विजय सूर्याशी नदीम पठाण, पोपट सकट, विनोद मोरया, ओमप्रकाश मौर्या, लक्ष्मण कोरे, सखाराम केदार आदी उपस्थित होते.सामाजिक सुरक्षा लागू करा, म्हातारपणी पेन्शन लागू करा, पथ विक्रेता कायद्याची राज्यात सक्षम अंमलबजावणी करा, सामान्यांची अनधिकृत घरे नियमित करा, सर्व शासकीय जागांवरील झोपडीधारकांचे सरसकट सर्वेक्षण करून पक्की घरे द्या आदी मागण्यांकडे घोषणा देत सर्वांचे लक्ष वेधले. पुढे या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. या वेळी राष्ट्रीय महासचिव शक्तिमान घोष, आमदार कपिल पाटील, आमदार विद्या चव्हाण, आमदार हरिभाऊ राठोड यांनी सभेला संबोधित करत आपला पाठिंबा दिला. नगरविकास मंत्री रणजित पाटील, यांच्याशी शिष्ठमंडळाने निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली. या वेळी त्यांनी सध्याचे सरकार सामान्य व गरिबांसाठी असून बांधकामे नियमितिकरण, झोपडीधारकांना घरे व फेरीवाला कायद्याबाबत शासन सकारात्मक आणि चांगले निर्णय लवकरच घेणार आहे. वरील विषयाबाबतराज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना सूचना दिल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.