शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

सुविधेच्या मागणीसाठी मोर्चा

By admin | Updated: December 23, 2016 00:33 IST

पिंपळे निलख-विशालनगर भागात पायाभूत आणि मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे नागरिकांचे हाल होत असून, याकडे महापालिका

वाकड : पिंपळे निलख-विशालनगर भागात पायाभूत आणि मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे नागरिकांचे हाल होत असून, याकडे महापालिका प्रशासनाला गांभीर्य नसल्याच्या निषेधार्थ महापालिकेच्या ड क्षेत्रीय कार्यालयावर मोर्चा काढला. तसेच गेल्या पाच वर्षांत पिंपळे निलख भागात पायाभूत सुविधा आणि मूलभूत नागरी सुविधा देण्यात महापालिका प्रशासन सपशेल अपयशी ठरले असून, परिसरातील रस्त्यांवर पथदिवे नाहीत, रस्त्यांचा विकास नाही, सुरळीत पाणी पुरवठा होत नाही, विशालनगरमध्ये बहुतांश नोकरदार वर्ग राहतो. नोकरीवरून रात्री-अपरात्री घरी पोहोचण्यास उशीर होतो. त्यातच पथदिवे बंद असल्याने त्यांची सुरक्षितता वाऱ्यावर आहे. फुटलेले ड्रेनेजलाइन, घनकचरा संकलन, गटार इत्यादी समस्यांचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे नागरिकांना जगणे असह्य झाले आहे. नागरिकांना भेडसावत असलेल्या या समस्यांवर महापालिका प्रशासनाने त्वरित उपाययोजना करीत नागरिकांना सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी करण्यात आली. या वेळी चंद्रकांत खोसे यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात कामठे यांच्यासह संदेश इंगवले, संभाजी तांबे, विघ्नेश नाईक, नैना कामठे, प्रगती कामठे, शोभा जगताप, कल्पना सदाकाळ, सुभद्रा वाघमारे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. या वेळी आंदोलनकर्त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून समस्या लवकरात लवकर सोडविण्याची मागणी केली.(वार्ताहर)