शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कडाका वाढला अन् गरिबांचा ‘फ्रिज’ महागला ! कच्च्या मालाचे दर वाढल्याने माठ महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 06:59 IST

थंडी आता पूर्णपणे ओसरली असून, उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. उन्हाचा पारा उंचावला आहे. नागरिकांना आता थंड पाण्याची आवश्यकता भासू लागली आहे. त्यामुळे गरिबांचा ‘फ्रिज’ संबोधल्या जाणा-या माठांचे येथील बाजारात आगमन झाले आहे.

मोशी : थंडी आता पूर्णपणे ओसरली असून, उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. उन्हाचा पारा उंचावला आहे. नागरिकांना आता थंड पाण्याची आवश्यकता भासू लागली आहे. त्यामुळे गरिबांचा ‘फ्रिज’ संबोधल्या जाणा-या माठांचे येथील बाजारात आगमन झाले आहे. मात्र, माठांसाठी लागणा-या कच्च्या मालाच्या किमतीत दुपटीने वाढ झाल्याने यंदा माठांच्या किमती गेल्या वर्षीच्या तुलनेने यंदा दुप्पट राहणार आहेत.नाशिक रस्ता, मोशी व भोसरीमध्ये लहान-मोठ्या आकारातील लाल, काळ्या रंगाचे माठ, रांजण आणि नळ लावलेले माठ विक्रीसाठी दाखल झाले आहेत. त्यातच उन्हाचा कडाका वाढल्याने माठांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असून, नागरिकांतून चांगली मागणी आहे. होळीनंतर माठांची मागणी वाढणार असून, या बाजारात तेजी येईल, असा माठ व्यावसायिकांचा अंदाज आहे.सर्वसामान्य आणि गरिबांकडून उन्हाळ्यात माठाला सर्वाधिक मागणी असते. असे असले तरीही आता उच्चभ्रू नागरिकांकडूनही माठाला पसंती देण्यात येत आहे. अशा उच्चभ्रूंकडून नक्षीकाम केलेल्या पांढ-या किंवा लाल माठाला अधिक पसंती असते. यात चिनी मातीपासून तयार केलेल्या माठांचे प्रमाण जास्त असते. परराज्यातील विक्रेते अशा तयार माठांची विक्री करतात. असे माठ तयार करण्यासाठी कारखाने सुरू झाले आहेत. परिणामी पारंपरिक पध्दतीने व्यवसाय करणाºया कुंभारबांधवांना या स्पर्धेत टिकण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.उच्चभ्रूंसह अनेक जण आता आॅनलाईन खरेदीकडे वळले आहेत. त्यामुळे नक्षीकाम असलेले माठ आता आॅनलाईन मिळू लागले आहेत. परिणामी कुंभारबांधवांना याचा फटका बसत आहे.लाकूड, मातीचे दर वाढले-सद्य:स्थितीत १५०० रुपये मातीचे एक ट्रॅक्टर, चारशे रुपये एका छोटा टेम्पोभर माती असे कच्च्या मालाचे दर आहेत. तयार केलेले माठ शेकण्यासाठी लागणारे लाकूड ७ ते ८ रुपये किलोप्रमाणे विकत घ्यावे लागत आहे. माठ बनविण्याची प्रक्रिया वेळखाऊ आहे. त्याला ठरावीक वेळ द्यावाच लागतो. त्यासाठी मेहनतही तशीच घ्यावी लागते.माठ बनविणे परवडत नाही-मेहनत व खर्च पाहता माठ बनविणे परवडण्यासारखे नाही. यामुळेच माठांचे भाव दुपटीने वाढलेले आहेत. भोसरीमध्ये राजन कुंभार, श्रीहरी कुंभार, बाळा कुंभार, जयप्रकाश नाथ या व्यावसायिकांनी विक्रीसाठी माठ ठेवलेले आहेत. साधारणत: पौष महिन्यात (डिसेंबर, जानेवारी) या महिन्यात बनविलेल्या माठांमध्ये उन्हाळ्यात अत्यंत गार पाणी असते, असे व्यावसायिक सांगतात.व्यवसाय करणे अवघड-३माठ खरेदी करताना ग्राहक काहीही भाव करतात. सांगितलेल्या दरापेक्षा निम्मे दरात माठ खरेदी करण्याची अपेक्षा ठेवतात. त्यामुळे हा व्यवसाय परवडेनासा झाला आहे. मात्र, पर्याय नसल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी हा पारंपरिक उद्योग आम्हाला करावाच लागत आहे. त्यातच आज-काल गरिबांच्या घरातही ‘इलेक्ट्रॉनिक फ्रिज’ आढळून येतो. त्यामुळे साहजिकच आमच्या व्यवसायावर परिणाम होतो, अशी खंतही कुंभार बांधवांनी व्यक्त केली.