शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवास

By admin | Updated: March 20, 2017 04:17 IST

मावळ तालुक्यातील दुर्गम भागातील दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा काळात होणारा त्रास कमी करण्यासाठी तळेगावचे उपनगराध्यक्ष

तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यातील दुर्गम भागातील दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा  काळात होणारा त्रास कमी करण्यासाठी तळेगावचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांच्या पुढाकाराने स्वर्गीय गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तालुक्यातील ५५ गावांतील तब्बल ६०० विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात मोठा दिलासा मिळाला आहे. अशा प्रकारचा हा राज्यात राबविला गेलेला पहिलाच उपक्रम आहे.मावळ तालुका हा डोंगर-दऱ्या व धरणांनी व्यापलेला आहे. त्यामुळे अनेक गावे अजूनही दुर्गम आहेत. दळणवळणाची पुरेशी साधने नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी काही किलोमीटरची पायपीट करावी लागते. दहावीची परीक्षा केंद्रे तर वडगाव मावळ, कामशेत किंवा पवनानगर अशा मोठ्या गावांमध्ये असतात. त्यामुळे परीक्षा देण्यासाठी दररोज कित्येक किलोमीटर प्रवास करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर येते. तालुक्याच्या टोकाला असलेली गावे तर परीक्षा केंद्रापासून तब्बल ४० किलोमीटर अंतरावर आहेत. परीक्षेच्या काळात दीड ते दोन तासाचा प्रवास म्हणजे विद्यार्थ्यांसाठी खरोखरच दिव्य असते. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने बहुतांश पालकांकडे स्वत:ची वाहने नाहीत. विद्यार्थ्यांना एसटी बसवर विसंबून राहावे लागते. गावापासून मुख्य रस्त्यापर्यंत चालत यायचे आणि एसटी बसची वाट बघायची. बस आल्यानंतर शहरात जायचे. तेथून पायपीट करत परीक्षा केंद्रापर्यंत पोहायचे. ज्यांना शक्य असेल त्यांनी परीक्षा केंद्र असलेल्या गावातील मंदिर, समाज मंदिरात, वसतिगृहात किंवा नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या घरी परीक्षेच्या काळापुरता आश्रय घ्यायचा, एवढाच पर्याय त्यांच्यापुढे होता.विद्यार्थ्यांची ही गैरसोय दूर करण्याचा निर्णय तळेगावचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी घेतला. त्यांच्या पुढाकारने स्थापन झालेल्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी तालुका पिंजून काढला. त्यात ५५गावातील विद्यार्थ्यांना मोफत वाहनव्यवस्थेची गरज असल्याचे आढळून आले. त्यानंतर या विद्यार्थ्यांना घरापासून परीक्षा केंद्रापर्यंत आणि परीक्षा झाल्यानंतर परत घरापर्यंत सोडविण्याची जबाबदारीे प्रतिष्ठानने उचलली. त्यासाठी त्या-त्या परिसरातील ६० चारचाकी वाहने भाड्याने घेण्यात आली. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना वेळेपूर्वी परीक्षा .केंद्रावर पोहचविणे आणि सुरक्षितपणे परत घरी पोहचविण्यात येत असल्याने पालकवर्गही निश्चिंत झाला आहे. प्रवासात दररोज वाया जाणारे तीन ते चार तास वाचू लागल्याने विद्याथीर्ही खूष आहेत. त्यामुळे यावेळी मावळातील निकालाचा टक्काही वाढण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)