शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिल्लीत बोलवून फाईल दाखवली अन्...'; भाजप प्रचाराचे कारण सांगत काँग्रेसची राज ठाकरेंवर टीका
2
"राहुल गांधी हे 'रणछोड दास'; जे स्वत: निवडणूक जिंकू शकत नाही, ते आपल्या पक्षाला..."
3
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
4
नरहरी झिरवाळ यांच्या 'त्या' फोटोमागचं सत्य भलेतच; खुद्द झिरवाळांनी केला खुलासा
5
खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगकडे केवळ १ हजार रुपयांची संपत्ती, एवढं झालंय शिक्षण, शपथपत्रातून समोर आली माहिती
6
Adah Sharma : अदा शर्माचं शिक्षण किती?, जगतेय आलिशान आयुष्य; कोट्यवधींची मालकीण, जाणून घ्या, नेटवर्थ
7
Bank Of Baroda : ₹७.१६ डिविडंड, ₹४८८६ कोटींचा नफा; तुमच्याकडे आहे का 'या' सरकारी बँकेचा शेअर?
8
Rahul Gandhi : "काँग्रेसनेही चुका केल्या, येत्या काळात राजकारणात..."; राहुल गांधींचं मोठं विधान
9
समोरासमोर या, विकासावर होऊ दे चर्चा; मिहिर कोटेचा यांचं संजय दिना पाटलांना आव्हान
10
खळबळजनक! दहावी नापास सफाई कर्मचाऱ्याने उघडलं हॉस्पिटल; 'असा' झाला पर्दाफाश
11
शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मे रोजी महायुतीची रॅली
12
फोक्सवॅगन टायगून! 350 किमी चालविली, 1.0 लीटरचे इंजिन, वजनदार... मायलेजने चकीत केले
13
बहिणीचा व्हिडिओ पाहून माधुरी भावूक, 'डान्स दिवाने'मध्ये साजरा झाला 'धकधक गर्ल' चा वाढदिवस
14
२८,२०० मोबाईल हँडसेट ब्लॉक करण्याचे आदेश, २० लाख नंबर्सचं पुन्हा होणार व्हेरिफिकेशन; कारण काय?
15
'सरफरोश'ची २५ वर्ष! आमिर खान- सुकन्या मोनेंची भेट.. म्हणाल्या, 'त्याचं मराठी बोलणं अन्...'
16
धक्कादायक! आई, पत्नीची केली हत्या, तीन मुलांना छतावरून फेकून केलं ठार, अखेरीस स्वत:ही संपवलं जीवन
17
"आम्ही बांगड्या घालून बसलो नाही"; गुन्हा दाखल होताच नवनीत राणांचा ओवीसींना इशारा
18
अत्यंत प्रतिकूल काळात सनातन वैदिक हिंदू धर्माचे रक्षण करणारे आद्य शंकराचार्य यांची जयंती; वाचा कार्य!
19
Lucky Sign: 'ही' चिन्ह दिसू लागली की समजून जा, वाईट काळ संपून 'अच्छे दिन' येणार!
20
"मोदींना दिल्लीत पाठवायचं ठरवलंय अन्.."; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारसभेत प्रवीण तरडेंचं भाषण गाजलं

शेअर मार्केटच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

By नारायण बडगुजर | Published: March 16, 2024 10:34 PM

पिंपरी-चिंचवडच्या सायबर पोलिसांकडून दोघांना अटक

पिंपरी : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून जास्त परताव्याचे अमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलने पर्दाफाश केला. याप्रकरणी दोघांना अटक केली. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.    विकास नेमीनाथ चव्हाण (४३, रा. गणेश नगर, नवी सांगवी), प्रदीप कृष्णा लाड (३२, रा. पिंपळे गुरव, सांगवी), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील महिलेला फेसबुकवरून गुंतवणूक संदर्भातील पोस्ट शेअर करून व्हाॅटसअप ग्रुपमध्ये सहभागी केले. जास्त परताव्याच्या आमिषाने त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे पाठविण्यास सांगितले. तसेच लिंक पाठवून ॲप डाऊनलोड करायला सांगितले. महिलेने भरलेले पैसे व नफा ॲपवर दिसत होता. परंतु ॲपवरून पैसे काढून घेता येत नव्हते. यात त्यांची १० लाख ६९ हजार ५७५ रुपयांची फसवणूक झाली. महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.   सायबर सेलचे सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण स्वामी यांनी तांत्रिक विश्लेष केले असता विकास चव्हाण याच्या बँक खात्यावर पैसे पाठवल्याचे समोर आले. त्यानुसार त्याला ताब्यात घेतले. प्रदीप लाड याने विकास याला बँक खाते सुरू करण्यास सांगितल्याचे समोर आले. त्यामुळे प्रदीपला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन मोबाईल जप्त केले. न्यायालयाने दोघांनाही चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. यातील आणखी संशयितांचा शोध सुरू आहे. तसेच गुंतवणूक केलेले पैसे नेमके कोणत्या खात्यावर गेले, कोणी काढून घेतले याचा शोध सुरू आहे.   

फिर्यादी महिलेने विकास चव्हाण व इतर ११ बँक खात्यांमध्ये पैसे भरले. या खात्यांमधून ५० कोटींपेक्षा जास्तीच व्यवहार झाले. अटक केलेल्या दाेघांच्या विरोधात इतर राज्यात २० तक्रारी आहेत. प्रदीप लाड याच्यावर यापूर्वीही अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

पोलिस उपायुक्त (गुन्हे) संदिप डोईफोडे, सहायक आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे, सहायक निरीक्षक सागर पानमंद, प्रवीण स्वामी, उपनिरीक्षक सागर पोमन, पोलिस अंमलदार नितेश बिचेवार, अतुल लोखंडे, श्रीकांत कबुले, कृष्णा गवळी, रजनिश तारु यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

टॅग्स :pimpri-acपिंपरी