शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

निगडी गावठाणात चौरंगी लढत

By admin | Updated: February 14, 2017 02:07 IST

निगडी गावठाण प्रभागात विविध जागांतून पाच विद्यमान नगरसेवक रिंगणात आहेत. ‘क’ जागेसाठी तीन विद्यमान नगरसेविकांसह

पिंपरी : निगडी गावठाण प्रभागात विविध जागांतून पाच विद्यमान नगरसेवक रिंगणात आहेत. ‘क’ जागेसाठी तीन विद्यमान नगरसेविकांसह माजी स्थायी समिती सभापती एकमेकींसमोर उभ्या ठाकल्या आहेत. त्यामुळे या जागेसाठी चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. प्रभाग १३ क्रमांकमध्ये निगडी गावठाण, सेक्टर क्रमांक २२, ओटा स्कीम, यमुनानगर, माता अमृतानंदमयी मठ, श्रीकृष्ण मंदिर, साईनाथनगर आदी परिसर येतो. ५५ हजार ७४ मतदारसंख्या आहे. या प्रभागात उच्चशिक्षित, मध्यमवर्गीय आणि गरीब मतदार असून विस्तारही मोठा आहे. ‘क’ जागेसाठी चौरंगी लढत होत आहे. येथून शिवसेनेच्या सुलभा उबाळे, भाजपाच्या संगीता पवार, मनसेच्या अश्विनी चिखले या तीन विद्यमान नगरसेविकांसह राष्ट्रवादी काँगे्रसकडून माजी स्थायी समिती सभापती सुमन पवळे रिंगणात आहेत. त्यामुळे या लढतीकडे लक्ष लागले आहे. यासह येथून काँगे्रसच्या राखी टाक, तर एमआयएमकडून मैमुना शेख या उमेदवार आहेत. ‘अ’ जागेसाठी शिवसेनेकडून अनु गवळी, भाजपाकडून कमल घोलप, राष्ट्रवादीकडून सुषमा खाडे यांच्यात लढत होणार आहे. ‘ब’ जागेसाठी विद्यमान नगरसेविका शुभांगी बोऱ्हाडे, भाजपाचे उत्तम केंदळे, मनसेचे राजू खाडे, राष्ट्रवादीचे राहुल येवले यांच्यात लढत आहे. बोऱ्हाडे यांनी काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादीतून शिवसेनेत उडी घेतली आहे. पाचपैकी दोन विद्यमान नगरसेविका दुसऱ्या पक्षाची, तर तिघी स्वपक्षाकडूनच उमेदवारी मिळवून रिंगणात उतरल्या आहेत. (प्रतिनिधी)