शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणाचा चार लाखांचा टप्पा पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 00:38 IST

विशेष मोहीम : गोवर-रुबेलाच्या सुमारे ६ लाख १६ हजार लसीकरणाचे उद्दिष्ट

पिंपरी : राज्य शासनाची गोवर-रुबेला लसीकरण मोहीम पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे राबविण्यात येत आहे. यासाठी शहरात १२०० ठिकाणी मोहीम सुरू आहे. या मोहिमेंतर्गत सहा लाख १६ हजार १९३ एवढे उद्दिष्ट आहे. यापैकी चार लाख ३४ हजार २३४ एवढे उद्दिष्ट पूर्ण झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

गोवर-रुबेला लसीकरण मोहीम २७ नोव्हेंबर २०१८ पासून राबविण्यात येत आहे. गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेत लाभार्थी म्हणून ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील सर्व बालके व विद्यार्थी येतात. या वयोगटातील जास्तीत जास्त बालक व विद्यार्थ्यांपर्यंत सर्व महापालिका व खासगी शाळा, अंगणवाडी, बालवाडी, नर्सरी, प्ले ग्रुपमार्फत मोहिमेपर्यंत पोहोचणे शक्य होत आहे. यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व मनपा व खासगी शाळांमध्ये लसीकरण मोहीम सुरू आहे. राज्य शासनाच्या मोहिमेत महापालिकेस लसीकरण उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महापालिकेचे विविध विभाग, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभाग, रोटरी क्लब, लायन्स क्लब, इंडियन मेडिकल असोसिएशन, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन, पिंपरी-चिंचवड डॉक्टर असोसिएशन, खासगी बालरोगतज्ज्ञ, पिंपरी-चिंचवड मुस्लिम विकास परिषद, एकात्मिक बालविकास प्रकल्प, अंगणवाडीसेविका आदींचे सहकार्य मिळत आहे. तसेच सार्वजनिक आरोग्यामध्ये गोवर लसीकरण हे एक प्रभावी साधन ठरले आहे. या मोहिमेत ज्या बालकांचे गोवर-रुबेला लसीकरण राहिलेले आहे, त्यांनी महापालिकेची रुग्णालये अथवा बाह्यसंपर्क सत्रांच्या ठिकाणी लसीकरण करून घ्यावे व मोहीम १०० टक्के यशस्वी करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन वैद्यकीय विभागाने केले आहे.पालकांना महापालिकेचे आवाहनपिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व सरकारी व खासगी शाळांमध्ये लसीकरण मोहीम सुरू आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये गोवर-रुबेला लसीकरणासाठी विशेष बूथ स्थापन करण्यात आलेले आहेत. तसेच, महापालिका कार्यक्षेत्रातील अंगणवाडी, बालवाडी, बांधकामे, वीटभट्ट्या आदी ठिकाणी बाह्यसंपर्क सत्रे आयोजित करण्यात आलेली असून, याबाबतची माहिती महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. लसीकरण केंद्रांवर बालकांचे लसीकरण करण्याचे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड